तुमच्या गावातील घरकुल यादी पाहायची आहे का? आता नाही टेन्शन! ही पद्धत करेल मदत

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक घरकुल योजना आहेत. यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना तसेच महाराष्ट्र सरकारच्या रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासारख्या योजनांचा उल्लेख करता येईल. या योजनांच्या माध्यमातून सरकार पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे घर बांधण्याकरिता आर्थिक सहाय्य करत असते.

आपल्याला माहित आहेच की, यामध्ये अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर केल्या जातात. परंतु यादीत आपले नाव आहे की नाही हे बऱ्याच जणांना अजून देखील कुठे पहावे हे समजत नाही. त्यामुळे आपण या लेखांमध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून घरकुल यादी कशी पाहायची याबद्दल माहिती घेणार आहोत.

मोबाईलवर अशापद्धतीने चेक करा तुमच्या गावातील घरकुल यादी

1- सर्वात आधी तुम्हाला https://pmayg.nic.in/netiayhome/home.aspx लिंक वर क्लिक करावे लागेल.

2- नंतर सर्वात आधी तुम्हाला मेन मेनू वर क्लिक करून Awassoft यावर क्लिक करणे गरजेचे आहे.

3- यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे रिपोर्ट असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे.

4- नंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे ती माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.

5- माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही ऑल स्टेट या ठिकाणी राज्याची निवड करायची आहे व राज्याची निवड केल्यानंतर तुम्ही राहत असलेल्या जिल्हा व तालुका निवडावा. यानंतर तुमच्या गावाची निवड करावी व सर्व माहिती अचूक पद्धतीने नमूद करावी.

6- त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक आन्सर इज हा पर्याय दिसेल त्या पर्यायामध्ये विचारलेली सगळी माहिती अचूक भरावी. या ठिकाणची माहिती अचूक भरणे खूप गरजेचे आहे. याच ठिकाणी बरेच जण चुकतात.

7- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे.

8- जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करत आहात तेव्हा जर तुमच्या गावांमध्ये घरकुले मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील.

9- या यादीची पीडीएफ फाईल डाऊनलोड देखील तुम्ही या ठिकाणी करू शकतात.

10- अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता व ती डाउनलोड देखील करू शकतात.