TVS Upcoming Electric Scooter : उद्या लॉन्च होणार Ola ला टक्कर देणारी TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, शानदार फीचर्ससह किंमत आहे..

Ahmednagarlive24 office
Published:
TVS Upcoming Electric Scooter

TVS Upcoming Electric Scooter : बाजारात सध्या पेट्रोलच्या किमती वाढल्याने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होऊ लागल्या आहेत. यामध्ये कंपन्या अनेक शानदार फीचर्स देत आहेत. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे.

कारण आता उद्या TVS मोटर कंपनी आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. भारतीय बाजारात लाँच झाल्यानंतर ही स्कुटर थेट स्पर्धा Ola S1 Pro, Ather 450X आणि Simple One या मॉडेल्सला टक्कर देऊळ. जाणून घ्या फीचर्स.

मिळतील शानदार फीचर्स

नवीन टीझरमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरचा फ्रंट फॅशिया हायलाइट केला आहे. सध्याच्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा ती जास्त स्पोर्टी दिसत आहे. तसेच क्रेओन संकल्पना ई-स्कूटरमध्ये सेटअप प्रमाणे त्यामध्ये व्हर्टिकल हेडलॅम्प दिसत आहे. स्पोर्टी एप्रन, डीआरएल आणि इंडिकेटरचे संकेत टीझरमध्ये मिळत आहेत. त्याशिवाय यात रिमोट लॉकिंगची सुविधा मिळत आहे.

लॉन्च तारीख

TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यात येईल. तर त्याचवेळी, सणासुदीच्या काळात ती बाजारात लॉन्च केले जाईल. त्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या iQube नंतर कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. iQube ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्रेऑन आधारित स्पोर्टियर ई-स्कूटर अनेक फीचर्सनी परिपूर्ण असणार आहे. त्यामध्ये उभ्या-स्टॅक केलेले एलईडी हेडलॅम्प डिझाइन पाहिले जाऊ शकते.

रेंज

TVS Creon ला 11.76 kW मोटर मिळेल. ही मोटर 15.7 bhp चा पॉवर देत आहे. ते ५.१ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग वाढवते. असे मानले जात आहे की ही इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षाच्या सुरुवातीला सादर केलेल्या BMW Motorrad CE 02 संकल्पना अर्बन बाईकसह त्याचे आधारभूत घटक सामायिक करेल. CE 02 मध्ये 11 kW बेल्ट-ड्राइव्ह मोटर असून ज्याचा कमाल वेग 105 kmph असेल. ही एकाच चार्जवर 90 किमीची रेंज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe