अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- नेवासे तालुक्यात आढळलेले चारही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण निगेटिव्ह झाल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील दुसरा व नेवासे तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण १४ मार्चला निष्पन्न झाला. हा रुग्ण परदेश वारी करून आला होता.
हा रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी आल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले.
त्यानंतर २७ मार्चच्या दरम्यान नेवासे शहरातून १० विदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील एक पॉझिटिव्ह निघाला.
नेवासे खुपटी रोडवर ११ एप्रिलला सापडलेला संशयित पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली. त्याला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले.
नगर येथे क्वारंटाइन असलेला एक जण पॉझिटिव्ह निघाल्याने नेवासे शहरातील संख्या चार झाली.
प्रशासन व आरोग्य विभागाने प्रचंड मेहनत घेत रुग्णांच्या राहत्या परिसरातमध्ये कडेकोट बंद ठेवत वेगाने नागरिकांची तपासणी केली
. संपर्कात आलेल्या अनेकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले. अनेकांचे स्त्राव घेऊन तपासणीस पाठवले.
सुदैवाने कोणीही पॉझिटिव्ह निघाले नाही. नेवासे शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवून लॉकडाऊन पाळण्यात आला.
नगरपालिका हद्दीत हॉटस्पॉट जाहीर करण्यात आला होता. त्याचे काटेकोर पालन करण्यात आले.
त्यामुळे शहर व तालुक्यात मागील १०/१२ दिवसांत एकही संशयित आढळलेला नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®