मुंबईतून रिक्षाने श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ सर्वांवर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- मुंबईच्या नालासोपारा परिसरातून दत्तनगर परिसरात पाचजण रिक्षाने श्रीरामपुरात आल्यानंतर परिसरातील लोकांनी सरपंच व इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना हे कळवल्यानंतर आरोग्य विभागाने या पाचही तपासणी केली.

मात्र, यापैकी तिघांना नगर येथे पाठवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी एक पुरुष, दोन महिला व तीन मुले असे पाच जण रिक्षाने विनापरवाना दत्तनगर परिसरातील सुतगिरणी रोडवर एका घरात आले होते.

ही माहिती परिसरातील नागरीकांना समजताच त्यांनी सरपंच व इतरांना ही माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले.

हे पाचही जण मुंबईच्या नालासोपारा भागातून आल्याचे समजले. त्यांना आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली. आरोग्य अधिकाऱ्यांना शंका आल्यानंतर तात्काळ संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

मात्र, यापैकी एक पती पत्नी व त्यांच्या मुलाला खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुढील तपासणीसाठी नगरला पाठवले. त्यांचा स्त्राव घेण्यात आला असून पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठवणले आहे, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment