Pune Bharti 2023 : 8वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज !

Ahmednagarlive24
Updated:

AICTS Pune Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे, अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. 

जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधत आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरतीसाठीची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील येथे काम करण्यास इच्छुक असाल तर ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोथोरॅसिक सायन्सेस पुणे, येथे पर्यवेक्षक प्रशासन, लेखा लिपिक, आया, हाऊस कीपर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

येथे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी लक्षात घ्या देय तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

वरील भरती अंतर्गत पर्यवेक्षक प्रशासन, लेखा लिपिक, आया, हाऊस कीपर पदांच्या एकूण 05 जागा भरल्या जाणार असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना यासाठी प्राधान्य दिले जाईल, येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार 8 वी ते पदवीधर असणे आवश्यक आहे.

पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, तरी अर्ज करताना भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.ही भरती पुण्यात होत असून, येथे अर्ज करण्याची वयोमर्यादा 40 ते 50वर्षे इतकी आहे. येथे उमेदवार ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करू शकतो.

इच्छुक उमेदवार [email protected] या ईमेल पत्त्यावर 5 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतो. या संबंधित अधिक माहिती हवी असल्यास उमेदवार afmc.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतो.

उमेदवारांनी लक्षात घ्या या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत, वर दिलेल्या ईमेलद्वारेच अर्ज सादर करायचे आहेत, अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे देखील आवश्यक आहे.

तसेच अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अन्यथा अर्ज नाकारले जातील. म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना वाचणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe