Rule Changes in September : सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम! पुढच्या महिन्यात होत आहेत ‘हे’ महत्वाचे बदल; जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:
Rule Changes in September

Rule Changes in September : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही बदल होत असतात. ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो, दरम्यान पुढच्या म्हणजे सप्टेंबर महिन्यात देखील काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. जाणून घ्या सविस्तर.

गॅस सिलिंडर

दरम्यान केंद्र सरकार आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर एकूण 200 रुपयांची सबसिडी जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता सरकारने या निर्णयाची घोषणा केली तर महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला 200 रुपयांनी कमी किमतीत सिलिंडर खरेदी करता येईल.

2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद

RBI ने मे महिन्यात 2000 रुपयांची नोट चलनात येणार अशी घोषणा केली होती. याच संदर्भात केंद्रीय बँकेकडून 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा बदलून किंवा जमा करण्यासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. समजा तुम्ही अजूनही 2000 रुपयांची नोट बदलली नसल्यास आजच हे काम करा.

अॅक्सिस मॅग्नस क्रेडिट कार्ड

Axis Bank ही बँक आपल्या ग्राहकांना Magnus क्रेडिट कार्ड सुविधा मोफत देत आहे. मात्र या बँकेने आता त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती शेअर केली आहे की 1 सप्टेंबरपासून वार्षिक शुल्क माफीची सुविधा मॅग्नस क्रेडिट कार्डवर बंद केली जाणार आहे.

पॅन-आधार लिंक

समजा आता तुम्ही अजूनही तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसल्यास तर ते 30 सप्टेंबरपर्यंत करा, कारण सरकारकडून पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने त्याचे पॅन आणि आधार लिंक केले नसल्यास ऑक्टोबरला 1 पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. एकंदरीतच तुम्ही तुमचे पॅन कार्ड वापरू शकणार नाही. तसेच तुमचे बँक खाते बंद होण्याची शक्यता आहे.

डिमॅट खाते नोंदणी

तुमचा पॅन आणि आधार लिंक नसल्यास त्याचा तुमच्या डिमॅट खात्यावरही परिणाम होऊ शकतो. SEBI कडून ट्रेडिंग आणि डिमॅट खातेधारकांसाठी नामांकन किंवा नामांकन मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

आधार कार्ड अपडेट

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) लोकांना आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देत असून आता ही सुविधा 14 सप्टेंबर 2023 नंतर संपेल. त्यामुळे आता UIDAI ने लोकांना असे आवाहन केले आहे की ज्यांनी 10 वर्षांपासून त्यांचे आधार कार्ड अपडेट केले नसल्यास त्यांनी 14 सप्टेंबरपर्यंत त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे.

अमृत ​​महोत्सव FD

IDBI ने ही खास FD योजना सुरू केली असून या एफडीचे नाव अमृत महोत्सव एफडी योजना असे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 375 दिवसांच्या या FD योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज मिळते. 444 दिवसांच्या FD अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना 7.15 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.65 टक्के व्याज देण्यात येत आहे.

एसबीआय Wecare

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI च्या विशेष ज्येष्ठ नागरिक FD योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 ही असणार आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.50 टक्के दराने व्याज मिळते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या शानदार योजनेचे नाव SBI Wecare असे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe