Samsung Smartphone Offer : आता तुम्ही Samsung चे जबरदस्त स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची आता हजारो रुपयांची बचत होऊ शकते. त्यासाठी लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. काही दिवसांसाठीच ही ऑफर असेल.
आता कंपनीच्या Galaxy Z Fold 5 आणि Galaxy Z Flip 5 फोनवर सवलत मिळत आहे. यावर बँक ऑफर आणि इतर ऑफर मिळत असल्याने या फोनच्या किमती कमी करता येत आहेत. अशी शानदार ऑफर कंपनीचं देत आहे. अशी ऑफर पुन्हा पुन्हा येत नाही.
तुम्हाला Galaxy Z Flip 5 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 85,999 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येईल. Fold 5 चा 256GB स्टोरेज व्हेरिएंट 1,38,999 रुपयांमध्ये खरेदीकरता येईल. हे लक्षात ठेवा की या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी असणार आहेत.
जाणून घ्या संपूर्ण ऑफर
कंपनीच्या फोल्डिंग स्मार्टफोनवर म्हणजे Galaxy Z Fold 5 वर 7,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच कंपनी या फोनवर 9000 रुपयांचा अपग्रेड बोनस देखील देत आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण 16,000 रुपयांची ऑफर दिली जात आहे. 9 महिन्यांच्या शून्य व्याज EMI चा पर्याय मिळत आहे.
या ऑफर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवर असून Samsung Galaxy Z Flip 5 बद्दल बोलायचे झाल्यास यावर तुम्हाला 7 हजार रुपयांचा कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस मिळेल. तुम्हाला तब्बल 14 हजार रुपयांची सवलत मिळेल. यावर तुम्हाला नो-कॉस्ट EMI ऑफरचा लाभ घेता येईल.
तुमच्यासाठी एकूण 11000 रुपयांपर्यंतचा बोनस या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा बोनस नॉन-ईएमआय पर्यायावर आहे. या सर्व ऑफर Galaxy Z Flip 5 च्या 512GB स्टोरेज प्रकार आणि Fold 5 च्या 512GB आणि 1TB स्टोरेज प्रकारांवर उपलब्ध आहेत.
किती आहे किंमत?
कंपनीचा Galaxy Z Fold 5 हा स्मार्टफोन आइस ब्लू, क्रीम आणि फँटम ब्लॅक रंगांत तुम्हाला खरेदी करता येईल. किमतीचा विचार केला तर Galaxy Z Fold 5 च्या 12GB RAM 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये इतकी आहे. तर त्याच वेळी, त्याचा 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,64,999 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच 1TB स्टोरेज असणारा फोन 1,84,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
आता तुम्हाला ग्रेफाइट, मिंट, क्रीम आणि लॅव्हेंडर रंगांमध्ये Galaxy Z Flip 5 खरेदी करता येईल. Galaxy Z Flip 5 च्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 99,999 रुपये इतकी आहे आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंट 1,09,999 रुपयांना खरेदी करता येईल. ही दोन्ही उपकरणे तुम्ही Samsung.com, Amazon, Flipkart आणि भारतातील इतर अधिकृत रिटेल स्टोअरमधून सहज खरेदी करू शकता.