दररोज केलेली 10 रुपयाची बचत तुम्हाला कोट्याधीश बनवू शकते! वाचा आणि समजून घ्या कशी आहे पद्धत?

Ajay Patil
Published:
investment plan

कष्ट करून पैसा कमावणे याला खूप महत्त्व आहे. परंतु त्याहीपेक्षा तुम्ही कमावलेला पैशाची बचत आणि त्या बचतीचे योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक याला खूपच महत्त्व आहे. गुंतवणूक करणे म्हणजे खूप मोठी रक्कम  एखाद्या योजनेमध्ये सातत्याने गुंतवत राहणे व काही वर्षानंतर भरभक्कम असा परतावा मिळवणे असे नव्हे. गुंतवणूक तुम्ही शंभर रुपयाची करू शकतात आणि दहा लाख रुपयांची देखील करू शकता.

फक्त तुम्ही गुंतवणूक कशा पद्धतीने करत आहात? याला यामध्ये खूप महत्त्व आहे. शंभर रुपये नव्हे तर तुम्ही अगदी दररोज दहा रुपयाची बचत केली तरी तुम्ही काही वर्षांनी कोट्यावधी रुपयांचा फंड जमा करू शकता. यामध्ये फक्त तुम्हाला बचतीची सवय लावून घेणे आणि गुंतवणुकीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण अगदी तुम्ही दहा रुपयाची जरी बचत केली आणि ती गुंतवली तरी तुम्ही एक कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास कसा करू शकतात याबद्दलची माहिती घेऊ.

 अगदी छोट्या गुंतवणुकीतून होता येते करोडपती

गुंतवणुकीमध्ये जर तुम्ही स्मार्टपणा दाखवला तर तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाची तरी नोकरी करत असाल तरी तुमच्याकरिता करोडपती होणे सोपे आहे. यामध्ये तुम्हाला फक्त तुमची जी काही पगार आहे किंवा तुमचे दररोजचे जे काही उत्पन्न येते त्यामधून फक्त दहा ते वीस रुपयांची बचत करायचे आहे व ते व्यवस्थित ठिकाणी गुंतवायचे आहेत. गुंतवणूक करून तुम्हाला जर मोठा फंड उभा करायचा असेल तर तुम्ही नियमितपणे एखाद्या चांगल्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची गरज असून तुम्हाला फक्त योग्य फंडाची निवड करणे गरजेचे आहे.

अनेक म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही मोठी रक्कम न गुंतवता अगदी दहा ते वीस रुपयांची गुंतवणूक देखील करून चांगला प्रकारे तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकतात. एस आय पी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत व यामध्ये तुम्ही छोट्यात छोटी रक्कम गुंतवणूक करणे सुरू करू शकतात.

 दहा रुपयाची बचत तुम्हाला कसे बनवू शकते करोडपती?

गुंतवणुकीमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे व या माध्यमातूनच तुम्हाला चांगला परतावा मिळतो. समजा तुम्ही दररोज दहा रुपये बचत केली तर तुम्ही प्रत्येक महिन्याला तीनशे रुपयांची बचत करतात. हे तीनशे रुपये तुम्हाला मॅच्युअल फंडामध्ये दीर्घ कालावधी करता गुंतवणूक गरजेचे आहे.

कारण म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्हाला 15 ते 20 टक्क्यांचा परतावा मिळणे शक्य आहे. दहा रुपये ऐवजी जर तुम्ही वीस रुपये दररोज बचत केली तर साधारणपणे महिन्याला सहाशे रुपये बचत होते.30 रुपयाची बचत केली तर 900 रुपये एसआयपी मध्ये तुम्ही गुंतवू शकतात. यामध्ये तुम्ही जितक्या लवकरात लवकर एसआयपी मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितके तुमच्यासाठी चांगले राहणार आहे.

तुम्हाला मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्हाला दीर्घ कालावधी करिता गुंतवणूक करणे गरजेचे आहे. समजा तुमचे वय वीस वर्षे आहे  आणि तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्ही दररोज वीस रुपये वाचवून एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये गुंतवले व त्यामध्ये चाळीस वर्षे सातत्य ठेवले तर तुम्ही करोडपती होऊ शकतात.

यामध्ये तुम्ही तीनशे रुपये एसआयपी मध्ये गुंतवले व ही गुंतवणूक 40 वर्षांपर्यंत केली तर तुम्ही दोन लाख 40 हजार रुपयांचा फंड तयार करता.तर यामध्ये 15 टक्के परतावा आणि सहाशे रुपयांच्या मासिक गुंतवणुकीसह तुम्ही चाळीस वर्षांमध्ये 1.88 कोटी रुपयांचा निधी तयार करू शकतात. एवढेच नाही तर तुम्ही एखाद्या एसआयपी मध्ये प्रत्येक महिन्याला 1000 रुपये गुंतवले तरी तुम्ही तेहतीस वर्षांमध्ये 1.1 कोटींचा फंड जमा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe