7th Pay Commission: या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नोकरीत प्रमोशन! वाचा यासंबंधीची महत्त्वाची अपडेट

Ajay Patil
Published:
7th pay commission

7th Pay Commission :- सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता वाढीच्या संबंधी अनेक मीडिया रिपोर्टमध्ये चर्चा सुरू असल्याचे आपल्याला दिसून येते. महागाई भत्त्यामध्ये लवकरच वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता आणि घर भाडेभत्ता हे खूप महत्त्वपूर्ण मुद्दे असून हे भत्ते आणि सर्व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या सातवा वेतन आयोगाच्या माध्यमातून जारी केल्या जातात.

जर आपण सातवा वेतन आयोगासंबंधी विचार केला तर हा 2014 मध्ये लागू करण्यात आला होता व त्याच्या तरतुदी या 2016 पासून लागू करण्यात आलेले आहेत. सातवा वेतन आयोग हा अनेक बाबतीत  कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असा आयोग आहे व याच आयोगा अंतर्गत आता एक नवीन अपडेट जारी करण्यात आले असून ते संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

 केंद्रीय मंत्रालयाकडून संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट जारी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून एक नवीन अपडेट जारी करण्यात आलेले असून संरक्षण मंत्रालयाचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नती अर्थात प्रमोशन देण्याकरिता संरक्षण मंत्रालयाने जी काही किमान पात्रता आहे त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे ज्या काही सुधारणा किंवा दुरुस्ती करण्यात आलेली आहे हे सातव्या वेतन आयोग अंतर्गत संरक्षण कर्मचारी आणि सैनिकांना लागू केली जाणार आहे. यासंबंधीचे महत्वाचे प्रसिद्धीपत्रक 22 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेले होते व या मध्ये मंत्रालयाने सेवा संरक्षण नागरिक कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन करिता किमान पात्रता जारी केली आहे. यामध्ये अशा कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन अर्थात पदोन्नती करिता काही निकष देखील जारी करण्यात आलेले आहेत.

 मंत्रालयाने काय म्हटले आहे अधिसूचनेत?

कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनबाबत मंत्रालयाने अधिसूचना काढली असून त्यामध्ये म्हटले आहे की कर्मचाऱ्यांचे जे काही विविध स्तर आहेत त्या स्तरांसाठी वेगवेगळ्या कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर स्तर एक व दोन साठी तीन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक असून स्थर एक ते तीन करिता तीन वर्षाचा अनुभव असावा.

तसेच कर्मचाऱ्यांचा स्तर 2 ते 4 करिता तीन ते आठ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या स्तरांप्रमाणे विचार केला तर स्तर 17 पर्यंतच्या एकूण कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते बारा वर्षांचा अनुभव असल्यास त्यांना प्रमोशन मिळणार आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाकडून महत्वाची माहिती शेअर करण्यात आली असून या माहितीनुसार नवीन अपडेट लगेच प्रभावीपणे लागू होणार आहे.

म्हणजेच जे कर्मचारी अहर्ता धारण करतील अशा कर्मचाऱ्यांना ताबडतोब पदोन्नती मिळणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारी पदोन्नती किती दिली जाणार आहे हे मंत्रालयाकडून मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe