Car Update: टोयोटाची ही 7 सीटर कार देणार एर्टिगाला टक्कर! वाचा या कारची वैशिष्ट्ये आणि किंमत

Ajay Patil
Published:
rumion car

Car Update :- भारतामध्ये अनेक कारनिर्मिती कंपनी असून अनेक ब्रँडेड असे मॉडेलची निर्मिती भारतामध्ये केली जाते. अनेक कार शौकीन लोकांना वेगवेगळ्या मॉडेलची आणि वैशिष्ट्य असलेले कार विकत घेण्याची क्रेझ असते. अनेक महागड्या एसयूव्ही कार भारतामध्ये असून यामध्ये इनोव्हा तसेच एरटिगा, महिंद्राच्या देखील अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार बाजारात आहेत. या सगळ्या कंपन्यांमध्ये जर आपण टोयोटा या कंपनीचा विचार केला तर ही कंपनी व्यावसायिक कार निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.

कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या पसंतीच्या असून मोठ्या प्रमाणावर या कंपनीचे ग्राहक आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे टोयोटोने एक नवी कार बाजारात आणली असून तिचे सध्या खूप चर्चा होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे असे बोलले जाते की टोयोटो ने आणलेली ही नवीन कार ईरटीगा कारला टक्कर देईल अशी वैशिष्ट्ये हिच्या मध्ये आहेत असे देखील बोलले जात आहे.

 टोयोटाची रूमीओन देणार एर्टिगाला टक्कर

टोयोटोने सर्वात स्वस्त अशी 7 सीटर कार भारतीय बाजारपेठेत आणली असून तिचे नाव रुमीओन असे आहे. ही कार मारुती सुझुकीच्या प्रसिद्ध असलेल्या मारुती एर्टिगा कारला स्पर्धक ठरेल असे म्हटले जात आहे. कार शौकीन अनेक दिवसांपासून या कारची वाट पाहत होते. या कारची किंमत आणि बुकिंग कशा पद्धतीने होईल त्याचा सगळा तपशील हा लवकरच कंपनीच्या माध्यमातून अधिकृतपणे शेअर केला जाण्याची शक्यता आहे.

साधारणपणे टोयोटाची ही सात सीटर कार 26 मायलेज देईल अशी माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. अनेक प्रकारचे आकर्षक वैशिष्ट्ये यामध्ये मिळणार असून ही कार पेट्रोल इंजन तसेच नियो ड्राईव्ह( इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर-ISG) तंत्रज्ञान आणि ई सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी बनवण्यात आलेली आहे.

 या कारची किंमत किती राहू शकते आणि बुकिंगचा तपशील

टोयोटाच्या रूमीओन कार ची किंमत साधारणपणे दहा लाख 29 हजार( एक्स शोरूम) पासून सुरू होऊन टॉप एंड व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही तेरा लाख 68 हजार रुपये इतकी आहे. रूमीओन कारची बुकिंग 11 हजार रुपयांच्या टोकन सह सुरू करण्यात आले असून 8 सप्टेंबर पासून या कारचे वितरण होईल अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. या कारचे  महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe