Health Tips : बऱ्याच जणांना रात्री अंघोळ करायला आवडते आणि ते कामावरून परतल्यावर आंघोळ करून रात्री झोपतात. पण तुम्हाला माहित आहे का की असे करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. रात्री अंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले नसते. असे तज्ज्ञांचे मत आहे, तज्ज्ञांच्या मते, रात्री अंघोळ करून झोपल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत रात्री आंघोळी करणे शक्यतो टाळावे. चला पाहूया रात्री अंघोळ करण्याचे तोटे काय आहेत.
बऱ्याच जणांचे असे म्हणणे आहे की रात्री अंघोळ केल्याने दिवसभराचा थकवा दूर होतो आणि त्यांना आराम वाटतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा आपण रात्री अंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान कमी होते. अशा प्रकारे आपल्या मेंदूला झोपेचा सिग्नल मिळतो.
या स्थितीत, जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे झोपेत समस्या निर्माण होतात. यामुळे आपल्या शरीरात इतरही अनेक समस्या निर्माण होतात, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत काय नुकसान होऊ शकतात जाणून घेऊया…
रात्री आंघोळीचे तोटे
-तज्ञांच्या मते, रात्री अंघोळ केल्याने रक्तदाब वाढू शकतो. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही रात्री गरम पाण्याने आंघोळ करता तेव्हा त्यामुळे तुमच्या हृदयाची गती वेगाने वाढू शकते, ज्यामुळे तुमचा रक्तदाबही वाढू शकतो.
एवढेच नाही तर रात्रीच्या वेळी जर कोणी गरम पाण्याने आंघोळ केली तर त्यामुळे पोटाचा त्रास तसेच पचनासंबंधितही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
यामुळे तुमचे वजनही वाढू शकते. एवढेच नाही तर ओल्या केसांनी झोपल्याने उशी ओलावा शोषून घेते. त्यामुळे त्यावर हानिकारक बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे डोक्याला आणि टाळूला खाज सुटणे, जळजळ होणे आणि कोंडा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
जर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करण्याची सवयी असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
-झोपण्याच्या किमान दोन तास आधी आंघोळ करावी.
-गरम पाण्याने आंघोळ टाळा.
-अन्न खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करू नये.
-ओल्या केसांनी झोपणे टाळा.