अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरला भरस्त्यात कमरेच्या बेल्टने मारहाण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कारला दुचाकीची धडक देऊन धक्का लागल्याच्या कारणातून डॉक्टरला शिवीगाळ करून भररस्त्यात कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. नगर-मनमाड रस्त्यावरील लोकमत भवनशेजारी ही घटना घडली.

साईदीप हॉस्पिटल येथील डॉक्टर मिलिंद कांबळे हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून घराकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून धडक दिली.

गाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराने डॉक्टरसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ, दमदाटी करून भररस्त्यात कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून दुखापत केली. हा प्रकार सुरू असताना रस्त्यात नागरिकांची चांगलीच गर्दी जमा झाली होती.

याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात डॉ. मिलिंद कांबळे यांच्या फिर्यादीवरून सचिन रामदास छजलानी (रा. विठा, ता. अकोले, जि. नगर, मूळ रा. भिंगार, नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मंगेश खरमाळे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment