Ahmednagar breaking : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने प्रवरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील जोर्वे येथे (दि.२७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी काल तिच्या पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा अरुण वाळके (रा. जोर्वे, ता. संगमनेर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

Satara News
तिचा पती अरुण सोपान वाळके याला दारुचे व्यसन असल्याने तो सतत मनीषा हिला त्रास देत होता. सततच्या त्रासाला वैतागून मनीषा हिने प्रवरा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत मनीषा हिचे वडील दत्तात्रय पवार यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अरुण वाळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.