अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांनी बाहेर काढला ‘त्या’ शेतात पुरलेला मजुराचा मृतदेह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक भागात एका शेतक-याच्या शेतात मजुराचा मृतेदह पुरण्यात आला होता. त्या शेतकऱ्याने त्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

त्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून शनिवारी पोलिसांनी शेतात उकरून तो मृतदेह बाहेर काढला. सुभाष रामभाऊ निर्मळ ( वय ५०) रा. निर्मळ पिंप्री, ता. श्रीरामपूर, असे त्या मयताचे नाव आहे.

दरम्यान हा मृतदेह कुजलेला असल्याने त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अशिम गोरक्षनाथ अभंग यांनी नेवासा पोलीस ठाण्यात एक तक्रार दिली होती. भेंडा बुद्रूक येथील पडीत शेताच्या वळणालगत तीन ते चार इसम उभे होते.

त्यांनी जेसीबी यंत्राच्या सहायाने खड्डा घेतला व त्यामध्ये काही तरी पुरले, असे अभंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पोलीस उपनिरिक्षक भरत दाते यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली.

त्यांनी पुरलेल्या जागी उकरले असता ते मृतदेह आढळून आला. अधिक चौकशी केली असता तो मृतदेह सुभाष निर्मळ यांचा असल्याचे समजले. तो येथेच एका शेतकऱ्याकडे मजूर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment