Ayushman Card Eligibility : केंद्र तसेच राज्य सरकारद्वारे गरजू आणि गरीब वर्गासाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्याचा फायद्या या वर्गाला होतो. यामध्ये निवृत्तीवेतन, घर, रोजगार, शिक्षण, भत्ता, विमा आणि इतर आर्थिक सहाय्य यांसारख्या योजनांचाही समावेश आहे. सरकारद्वारे चालवली जाणारी अशीच एक आरोग्य योजना म्हणजे ‘आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना.’
सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेशी मोठ्या संख्येने लोक जोडलेले आहेत आणि जर तुम्हालाही या योजनेत सहभागी होऊन मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला आधी तुमची पात्रता तपासावी लागेल. आणि मग अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमची योग्यता कशी तपासू शकता, चला जाणून घेऊया.
आयुष्मान योजना केंद्र सरकार चालवली जात आहे आणि आता अनेक राज्य सरकारेही त्यात सामील झाली आहेत. त्याच वेळी, या योजनेअंतर्गत, पात्र लोकांचे आयुष्मान कार्ड प्रथम बनवले जातात, त्यानंतर कार्डधारक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकतात.
तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या…
-तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टल pmjay.gov.in वर जावे लागेल.
त्यानंतर येथे जाऊन तुम्हाला ‘Am I Eligible’ हा पर्याय मिळेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
-त्यानंतर तुम्ही तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाका, ज्यावर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल. नंतर हा OTP टाका यानंतर, तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील, पहिल्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. नंतर दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक भरावा लागेल.
-त्यानंतर तुम्हाला सर्च बटणावर क्लिक करावे लागेल, यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमची पात्रता कळेल. आणि तुम्हाला या योजेनचा लाभ घेता येईल.