Cheapest Cars : देशात इंधनाच्या किमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे आता प्रत्येकजण कार खरेदी करत असताना मायलेजचा विचार करत आहे. भारतीय बाजारात उत्तम मायलेज देणाऱ्या खूप कार्स उपलब्ध आहेत ज्या तुम्ही खरेदी करू शकता.
परंतु कार खरेदीसाठी प्रत्येकाकडे लाखो रुपये असतातच असे नाही. जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही अवघ्या 50 हजार रुपयात टोयोटाची प्रीमियम फीचर्स असणारी कार खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये प्रीमियम हॅचबॅक विकत घ्यायची असेल, परंतु तुम्हाला योग्य पर्याय निवडता येत नसेल, तर पर्याय म्हणून, टोयोटा ग्लान्झाच्या बेस मॉडेल खरेदी करू शकता. तुम्हाला आता फायनान्स प्लॅनच्या तपशीलांसह ही कार अगदी स्वस्तात खरेदी करता येईल.
जाणून घ्या किंमत
टोयोटा ग्लान्झाच्या बेस मॉडेलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 6,81,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे आणि ऑन रोड ही किंमत 7,66,487 रुपये इतकी होते.
फायनान्स प्लॅन
आता तुम्ही टोयोटा ग्लान्झा कॅश पेमेंट मोडमध्ये खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी ७.६६ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. परंतु जर तुमच्याकडे तेवढे बजेट नसेल, तर तुम्ही कार फायनान्स प्लॅनद्वारे, अवघ्या 50 हजार रुपयात खरेदी करू शकता.
आता ऑनलाइन कार फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, समजा तुमचे बजेट 50 हजार रुपये इतके असेल, तर या आधारावर बँक तुम्हाला 7,16,487 रुपयांचे कर्ज देईल. वार्षिक 9.8 टक्के दराने व्याज तुमच्याकडून घेण्यात येईल.
एकदा तुम्हाला कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला 50,000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहेत. नंतर बँकेने ठरवल्यानुसार 5 वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक महिन्याला 15,153 रुपये मासिक EMI भरावे लागतील.
किती आहे मायलेज?
कंपनीकडून Toyota Glanza मध्ये 1197cc इंजिन देण्यात आले आहे जे 6000 rpm वर 88.50 bhp ची पॉवर आणि 4400 rpm वर 113 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या कारच्या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडला आहे. ही हॅचबॅक कार 22.35 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. हे मायलेज ARAI ने प्रमाणित आहे.