अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगीक वसाहतीमधील परप्रांतिय कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विनायक कन्हार (रा. ओडिसा) असे कामगाराचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यातील सूरज बिल्डकॉन या कंपनीतील विनायक कन्हार रा.ओडीसा हा काम करत होता.
याने वाघुंडे गावात कंपनी कामगार राहत असलेल्या चाळीतील खोलीमध्ये दि.९रोजी रात्री ९.३० वाजेपूर्वी आत्महत्या केली. याबाबत राहुल बबन गाडीलकर (रा.वाघुंडे बुद्रुक) यांनी सुपा पोलिसांना माहिती दिली.
या माहितीवरून सुपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरच्या कामगाराचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला
व त्यानंतर रुग्णवाहीकेने त्याच्या गावाकडील इसमासोबत मयताचे प्रेत त्याचे मूळ गाव भुटकल नाली, कंधमाल बधाभुईन (ओरीसा) येथे रवाना करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®