खासदार झालेला नातू आजोबांचे स्वप्न कसे साकारणार ?

Ahmednagarlive24
Published:

राहाता :- स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी तब्बल आठ वेळेस संसदेत प्रतिनिधित्व केले. त्यामुळेच केंद्रीय मंत्री होऊन देखील लोकमानसात ‘खासदारसाहेब’ हे अढळ स्थान प्राप्त केले.

File Photo : लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतर सुजय विखे पाटील कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष करताना

साहेबांच्या रूपाने या विखे घराण्यात साडेतीन दशके खासदारकी नांदली. आता खासदारसाहेबांचे वारसदार डॉ. सुजय हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विखे पाटील परिवारातील व्यक्ती पुन्हा खासदार झाले.

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदानंतर बाळासाहेब सर्वप्रथम १९७१ मध्ये लोकसभेत निवडून गेले आणि खासदार झाले. त्या नंतर २००९ पर्यंत काही अपवाद वगळता लोकनेते बाळासाहेब यांनी संसदेत प्रतिनिधित्व केले.

File Photo – कै.खा बाळासाहेब विखे पाटील माजी राष्ट्रपती प्रतिभा पवार यांच्या समवेत

या लोकसभेच्या प्रदीर्घ प्रतिनिधित्वामुळेच त्यांना ‘खासदारसाहेब’ ही बिरुदावली आजन्म मिळाली. मृत्यू पश्चात देखील त्यांचा उल्लेख खासदारसाहेब म्हणूनच होत आहे.

File Photo विरोधी पक्षनेत राधाकृष्ण विखे पाटील

विखे पाटील परिवाराचे तिसऱ्या पिढीचे वारसदार राधाकृ ष्ण विखे-पाटील यांनी सर्वप्रथम १९९५ मध्ये विधानसभेत प्रतिनिधित्व केले. मागील २४ वर्षांपासून ते प्रतिनिधित्व करीत आहेत.

या काळात राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद आणि विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी भूषविले. त्यांचा उल्लेख ‘नामदारसाहेब’ असाच केला जातो.

File Photo जि.प अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील

दरम्यान नामदार साहेबांच्या पत्नी शालिनीताई तथा वहिनीसाहेब यांच्याकडे देखील दोनदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आले.

आता वाड्याच्या चौथ्या पिढीचे वारसदार असणारे डॉ. सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे.

File Photo सुजय विखे पाटील

खासदारसाहेब वयाच्या ३९ व्या वर्षी प्रथम खासदार झाले होते. त्यांच्या नातवाने अर्थात सुजय यांनी वयाच्या ३७ व्या वर्षीच लोकसभेत प्रवेश केला आहे.

पश्चिमचे पाणी वळविण्याचे स्वप्न खासदारसाहेबांनी पाहिले होते. खासदार झालेला नातू आजोबांचे स्वप्न कसे साकारणार,याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment