BMC Lokmanya Tilak Bharti 2023 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु; येथे पाठवा अर्ज

BMC Lokmanya Tilak Bharti 2023

BMC Lokmanya Tilak Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका, लो. टि. म स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालया अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम असेल.

या भरती अंतर्गत “वैद्यकीय संक्रमण सल्लागार, कनिष्ठ बालरोग रक्तदोष – कर्करोग तज्ञ, अतिदक्षता बालरोग तज्ञ (पूर्ण वेळ), मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भूल तज्ञ, भेट देणारे बीएमटी फिजिशियन, ऑडिओलॉजिस्ट (अंशवेळ), मुख्य परिचारिका/परिचारिका समन्वयक, समुपदेशक, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.

वरील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवगेळी असेल, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावेत. ही भरती मुंबई येथे होत असून, येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 38 ते 62 वर्षे इतके पाहिजे.

उमेदवार, ‘मनपा- कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसिमीया केअर, बालरोग रक्तदोष कर्करोग आणि बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र, पहिला मजला, कनाकिया एक्सॉटिका समोर, सीसीआय कंपाऊंड, बोरिवली (पू.) मुंबई – 400066’. या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष हजर राहून आपले अर्ज सादर करू शकतात. लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची 13 सप्टेंबर 2023 आहे.

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असून, अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीस 18 सप्टेंबर 2023 रोजी बोलवले जाईल. मुलाखती संबंधित माहिती उमेदवारांना फोन किंवा इमेलद्वारे कळवली जाईल. तरी उमेदवारांना भरती संबंधित आणखी माहिती हवी असल्यास उमेदवार www.ltmgh.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

असा करा अर्ज

-वरील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
-अर्ज शेवटच्या तारखे अगोदर वर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2023 आहे.
-देय तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
-अर्जासोबत आवश्यक कागपत्रे जोडावीत, त्यासाठी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक तपास.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe