7th Pay Commission: या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्यासोबतच प्रमोशन! वाचा प्रमोशनसाठी आवश्यक निकष

Ajay Patil
Published:
7th pay commission

7th Pay Commission:- सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसोबत मोठ्या प्रमाणावर चर्चा असून लवकरच सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात येईल असे बोलले जात आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 46% इतका होईल.

लवकरच याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु यासोबतच केंद्र सरकारच्या सातवा वेतन आयोग अंतर्गत असलेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या करिता व संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आली आहे. नेमकी ही अपडेट काय आहे? या विषयाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नोकरीत बढती

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सातव्या वेतनआयोगांतर्गत असलेले कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांकरिता एक आनंदाची बातमी असून या कर्मचाऱ्यांना प्रमोशन म्हणजेच नोकरीत बढती मिळणार आहे. याबाबत संरक्षण मंत्रालयाने महत्वपूर्ण माहिती दिली असून या माहितीनुसार संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांकरिता हे प्रमोशन जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये असलेल्या सर्विस कालावधीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. या प्रमोशन करिता कर्मचाऱ्यांसाठी काही पात्रतेचे निकष असून हे निकष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ही बढती अर्थात प्रमोशन मिळणार आहे.

 प्रमोशन करिता हे आहेत सर्विसचे निकष

या कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन संबंधी मंत्रालयाकडून एक महत्त्वाची सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे व यामध्ये प्रमोशन करिता कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या स्तरांकरिता वेगवेगळ्या कामाचा अनुभव यानुसार प्रमोशन ठरविण्यात येणार आहे. म्हणजेच लेवल एक ते दोन करिता तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे.

त्यासोबत लेव्हल एक ते तीन करिता तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे तर लेव्हल दोन ते चार करिता तीन ते आठ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.  तसेच  लेवल 17 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांकरिता एक ते बारा वर्षांचा अनुभव असेल तरच अशा कर्मचाऱ्यांना प्रमोशनचा लाभ दिला जाणार आहे. प्रत्येक लेव्हल करिता प्रमोशनसाठी वेगवेगळे निकष लावण्यात आलेले असून ग्रेडनुसार यासाठीची यादी शेअर देखील करण्यात आली आहे.

याच आधारावर  कर्मचाऱ्यांना प्रमोशन देण्यात येणार आहे. हे नवीन जे काही अपडेट आहे ते ताबडतोब लागू करण्यात येणार असल्याची माहिती देखील संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. जे कर्मचारी पात्र असतील त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार ताबडतोब प्रमोशन दिले जाणार आहे.परंतु हे प्रमोशन कोणत्या पदांसाठी असणार आहे हे मात्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe