RBI Bharti 2023 : RBI मध्ये नोकरीची उत्तम संधी; तब्बल 450 रिक्त पदांवर भरती सुरु…

Sonali Shelar
Published:
RBI Bharti 2023

RBI Bharti 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत सध्या रिक्त पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा आणि आपले अर्ज सादर करावे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत “सहाय्यक” पदांच्या एकूण 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे असून, येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

वरील भरती अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांच्या एकूण 450 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 20 ते 28 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क

जनरल/ OBC/ EWS उमेदवार 450/- रुपये तर SC/ST/PwD उमेदवारांसाठी 50/- रुपये इतकी फी असणार आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

तुम्हाला भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
-उमेदवार https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या वेबसाईटद्वारे अर्ज करू शकतात.
-उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करावे.
-ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी आणि फी/ सूचना शुल्क भरण्यासाठी वेबसाईट लिंक 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत खुली ठेवण्यात येईल.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, लक्षात घ्या अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe