India News : देशात गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाचा पुरेसा साठा आहे. सरकार साठेबाजी करणाऱ्यांवर कडक नजर ठेवत असल्याने प्रमुख जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किरकोळ किमतींमध्ये आगामी सणासुदीच्या हंगामात कोणतीही तीव्र वाढ होण्याची शक्यता नाही, असा विश्वास खाद्य सचिव अन्न सचिव संजीव यांनी व्यक्त केला आहे.
‘म्हणून माझे विश्लेषण असे आहे की, पुढील सणासुदीच्या हंगामात, गहू किंवा तांदूळ किंवा साखर किंवा खाद्यतेल असो, ज्या वस्तूंचा आम्ही व्यवहार करतो, त्या वस्तूंच्या किमतीत मला कोणत्याही प्रकारची मोठी वाढ होताना दिसत नाही,’ असे चोप्रा पत्रकारांना म्हणाले.
किमतींमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, घाऊक विक्रेते आणि मोठ्या साखळी किरकोळ विक्रेत्यांसाठी साठा मयार्दा आणखी २००० टनपर्यंत कमी करण्यात आली आहे आणि किमतीत वाढ झाली आहे.
आवश्यक असेल तेव्हा सरकार सुधारणात्मक कारवाई करत आहे. साखरेचे दर स्थिर असले तरी, ऑगस्टमध्ये कमी पावसामुळे तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवांमुळे काही बाजारपेठांमध्ये अलीकडेच साखरेच्या भावात भावात वाढ झाली आहे.
देशात ८५ लाख टन साखरेचा पुरेसा साठा आहे. हा साठा साडेतीन महिन्यांच्या गरजांसाठी पुरेसा आहे. या वर्षी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता इस्मा या उद्योग संस्थेने व्यक्त केलेल्या भीतीला सरकार मानत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात गव्हाचा साठाही पुरेसा आहे आणि सध्या किरकोळ विक्रीचे दर सरासरी ३० रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिर आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत, सरकारकडे २०२ लाख टनांच्या गरजेच्या तुलनेत २५५ लाख टन गव्हाचा साठा होता. गरज भासल्यास सरकार खुल्या बाजारात गव्हाची आक्रमक विक्री करू शकतो, असेही ते म्हणाले.
खाद्यतेलाचा ३७ लक्ष टन साठा
देशात सध्या ३७ लाख टन खाद्यतेलाचा साठा आहे. हा साठा गेल्या वर्षीच्या २७ लाख टनांपेक्षा जास्त आहे. कमी जागतिक किमतीचा फायदा घेत उद्योगाने या वर्षी विक्रमी खाद्यतेल आयात केले आहे. त्यामुळे जादा साठा आहे आणि परिणामी आगामी हंगामात कोणताही तुटवडा किंवा किंमती वाढण्याची शक्यता वाटत नाही असे ते म्हणाले.