लंडनमधील ६५ भारतीय पुण्यात दाखल ; महापालिका घेतीये खबरदारी

Ahmednagarlive24
Published:

लॉक डाऊनमुळे राज्यांबरोबरच इतर देशातही भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी शासनाकडून एक विशेष मोहीम राबविली जात आहे.

रविवारी लंडनहून ६५ लोकांना पुण्यात आणण्यात आलं असून करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीनं खबरदारी म्हणून त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

परदेशातून आलेल्या नागरिकांची व्यवस्था करण्यासाठी कार्यकारी अभियंते युवराज देशमुख यांची नियुक्ती केली आहे. परदेशातून आलेल्या भारतीयांना १४ दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं जाणार असून, हॉटेलचा खर्च त्यांनाच करावा लागणार आहे.

पुण्यात आल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्यावर १४ देखरेख ठेवण्याचं काम महापालिका करणार आहे. जवळपास 200 लोकांची सध्या व्यवस्था करण्यात आल्याचे समजले आहे.

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना परत पाठवण्याबरोबरच परदेशातील भारतीयांना परत आणण्याचं काम सुरू झालं आहे. विविध देशातील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी विशेष विमानं सोडण्यात आली आहेत.

रविवारी पुण्यात लंडनहून ६५ भारतीय नागरिक दाखल झाले. “परदेशातून भारतीयांना आणण्याचं काम सुरू झालं आहे. रविवारी पुण्यात लंडनहून ६५ भारतीय दाखल झाले.

पुणे महापालिकेच्या वतीनं त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बालेवाडी येथील हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आहे,” अशी माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment