LIC Jeevan Tarun Policy : LIC आपल्या लाखो ग्राहकांसाठी वेळोवेळी अनेक योजना आणत असते. दरम्यान LIC कडून मुलांसाठी अशीच योजना राबवली जात आहे, ती म्हणजे जीवन तरुण पॉलिसी योजना. मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याच्या उद्देशाने जीवन तरुण पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. LIC च्या या गुंतवणूक योजनेत काय खास आहे आणि त्याचे फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया.
काय आहे जीवन तरुण योजना?
जीवन तरुण पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना आहे. LIC ची ही योजना 0 ते 12 वयोगटातील मुलांसाठी आहे. यामध्ये पालक मुलांच्या शिक्षणाशी संबंधित सर्व खर्चासाठी या योजनेत लग्नापर्यंत गुंतवणूक करू शकतात.
ही पॉलिसी घेण्यासाठी मुलाचे वय कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त 12 वर्षे असावे. या पॉलिसीसाठी, मुलाचे वय 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रीमियम भरावा लागेल. मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर तुम्हाला या पॉलिसीचा लाभ मिळेल. जीवन तरुण पॉलिसी 75,000 रुपयांपर्यंतच्या किमान विमा रकमेसाठी घेतली जाऊ शकते. त्याची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. ही पॉलिसी फक्त मुलाच्या नावानेच घेता येते. आणि यातून मिळणारी रक्कम फक्त मुलालाच दिली जाते.
25 वर्षात लाखो रुपये मिळतील
तुमचे मूल २० वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार तीन महिने, सहा महिने आणि वार्षिक प्रीमियम भरू शकता. जर तुम्ही जीवन तरुण पॉलिसीमध्ये दररोज 150 रुपये गुंतवले तर वार्षिक प्रीमियम 54000 रुपये असेल. याचा अर्थ असा की तुमची 8 वर्षांची गुंतवणूक 4,32000 रुपये होईल. यासोबतच तुम्हाला गुंतवणुकीवर 2,47,000 रुपयांचा बोनस देखील मिळेल. या पॉलिसीची विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. त्यानंतर तुम्हाला लॉयल्टी बोनस म्हणून 97,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला या पॉलिसी अंतर्गत 8,44,550 रुपये मिळतील.