टेलिफोनची वायर सरळ न राहता वेटोळे प्रकारची का असते? काय आहेत त्यामागील महत्वाची कारणे? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
telephone

आपण अनेक यंत्र पाहतो त्या यंत्रांमध्ये काही रचना ही विशिष्ट प्रकारची असते व अशी विशिष्ट रचना करण्यामागे देखील बरीच कारणे असतात. कारण आपण जर कुठल्याही गोष्टीचा विचार केला तर ती कुठल्याही कारणाशिवाय घडत नाही किंवा तिची रचना किंवा निर्मिती केली जात नाही. याबद्दल उदाहरणच घेतले तर गुरुत्वाकर्षणाचा नियम जर पाहिला तर हा सफरचंद झाडावरून वरती न जाता खाली का पडले या एकाच मुद्द्यावरून लागला म्हणजेच प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही वैज्ञानिक कारण असते.

त्याच पद्धतीने आपण टेलिफोनचा विचार केला तर टेलिफोनची वायर इतर वायर प्रमाणे सरळ न असता वेटोळे म्हणजेच कॉईल प्रकाराचे असते. आता जर प्रमुख्याने आपण तारांचा किंवा वायर चा वापर केला तर त्यामधून विजेचा सप्लाय होणे हे एक काम असते. परंतु टेलीफोनची वायर सरळ न ठेवता ती कॉइल या प्रकाराचे का ठेवली जाते हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्याबद्दलचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेऊ.

 टेलोफोनची वायर कॉइल प्रकाराची का असते?

कॉईल वायरचा वापर हा गेला कित्येक वर्षापासून करण्यात येत आहे. परंतु टेलिफोन मध्ये या प्रकारची वायर जास्त करून वापरली जाते. टेलिफोन शिवाय अनेक कारखान्यांमध्ये देखील अशा वायरिंगचा वापर होतो. जर आपण इतर वायरची तुलनेत या कॉईल वायरचा विचार केला तर तिची डिझाईन हे जास्त सुरक्षित समजले जाते.

यामध्ये सुरक्षा करिता प्लास्टिक इन्सुलेशनमध्ये कोटिंग करण्याची प्रक्रिया केलेली असते व आतील तारांना या विशेष प्लास्टिक मध्ये आच्छादित केले जाते व ते स्प्रिंग किंवा कॉइल मध्ये बनवले जातात. त्यानंतर त्यांची टेस्ट घेतली जाते. आपल्याला माहित आहे की तुम्ही ही वायर कितीही ताणू शकता व आतील तारांवर तिचा काहीच परिणाम होत नाही.

फोनसाठी या प्रकारची वायर वापरण्यामागील प्रमुख कारण म्हणजे जेव्हा व्यक्ती फोनवर बोलतो तेव्हा बऱ्याचदा लोक बोलताना रिसिवरला फोन पासून खूप दूरवर खेचतात.कॉइल वायर ही फ्लेक्सिबल असल्यामुळे ती सहजपणे खेचली जाते व जेव्हा रिसिंवर फोनवर ठेवला जातो तेव्हा ती वायर पुन्हा आहे त्या स्थितीत येते.

जर कॉइल वायर ऐवजी साधी वायरचा वापर फोन मध्ये केला असता तर ती फोनच्या आजूबाजूला खूप पसरलेली राहिली असती व त्याला जागा देखील जास्त लागली असती.परंतु कॉइल वायर ही आहे त्या जागेतच व्यवस्थित राहते. तसेच कॉईल वायरमध्ये सरळ वायरच्या तुलनेत तुटण्याचा आणि तिला गाठ पडण्याचा धोका देखील नसतो. त्यामुळे इंटरनेट सिग्नल आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी कॉइल वायर चा वापर प्रामुख्याने केला जातो.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe