धोक्याचा इशारा; समुद्राची पातळी ‘इतक्या’ मीटरने वाढणार

Ahmednagarlive24
Published:

मुंबई एका संशोधनानंतर समुद्र पातळीबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका पथकाने याबाबत खुलासा केला आहे की, 2100 पर्यंत समुद्राची पातळी एक मीटरपेक्षाही जास्त आणि 2300 पर्यंत पाच मीटरपेक्षा उंच होणार आहे.

या संशोधनाच्या अंतर्गत भविष्यात समुद्राच्या पातळीत होणाऱ्या वाढीसंबंधी वेगवेगळ्या स्तरांच्या अंदाजाबद्दल विस्तृत आश्वासन दिलं आहे. हे संशोधन क्लायमेट एंड एटमॉसफेरिक सायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

संशोधकांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे की, जर जागतिक उत्सर्जनाचे लक्ष्य गाठता आलं नाही तर 2100 पर्यंत समुद्राची पातळी एक मीटरपेक्षाही जास्त आणि 2300 पर्यंत पाच मीटरपेक्षा उंच होईल.

अशा परिस्थितीत ग्लोबल वार्मिंग पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 2 अंश सेल्सिअस इतकेच मर्यादित आहे. समुद्र पातळीची वाढ 2100 पर्यंत 0.5 मीटर आणि 2300 पर्यंत 0.5 ते दोन मीटर पर्यंत असू शकते.

उच्च उत्सर्जनाची स्थितीत जेव्हा वार्मिंग 4.5 डिग्री सेल्सियस असेल. अशात तज्ञांचा अंदाज आहे की, 2100 पर्यंत 0.6 ते 1.3 मीटरपर्यंत आणि 1.7 ते 5.6 मीटर ते 2300 पर्यंत ही वाढ असू शकते.

हा आंतरराष्ट्रीय अभ्यास 106 समुद्र पातळीवरील तज्ञांच्या मतांवर आधारित आहे. समुद्र पातळीच्या वाढीस मर्यादा घालण्यासाठी कमी उत्सर्जन धोरण अवलंबण्याचं महत्त्व या अभ्यासात अधोरेखित केले आहे.

सिंगापूरची नानयांग टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधनाचं नेतृत्त्व करणारे बेंजामिन हॉर्तोन यांनी म्हटलं की,

समुद्राच्या पातळीवरील वाढीच्या अंदाजाविषयी माहिती आणि अनिश्चितता कमी करणं. तसंच परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या निर्णयासाठी ते आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment