Pune-Mumbai Expressway:- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई या दोन्ही महत्त्वपूर्ण असलेल्या शहरांना जोडणाऱ्या पुणे ते मुंबई या एक्सप्रेसवेच्या बाबतीत वाहतूक कोंडीची समस्या आहे कायम दिसून येते. सुट्ट्यांचा कालावधी असेल तर वाहतूक कोंडीचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूप धारण करतो.
जर आपण पुणे ते मुंबई महामार्गाच्या वाहन क्षमतेचा विचार केला तर क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. त्यातल्या त्यात शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तर वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते व तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाचा रांगा लागतात.
![pune-munbai expressway](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/09/ahmednagarlive24-a-166.jpg)
त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावाच लागतो आणि प्रवासाला देखील खूप मोठा वेळ वाया जातो. त्यामुळे आता ही समस्या डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून लवकरात लवकर वाहतूक कोंडीची समस्या पासून मुक्तता मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
एमएसआरडीसी उचलणार हे पाऊल
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुंबई ते पुणे एक्सप्रेस वर कायमच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते व त्यातल्या त्यात शनिवार व रविवार आणि इतर सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढल्यामुळे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे ही समस्या डोळ्यासमोर ठेवून हा महामार्ग आठ पदरी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात असून आणखी एक पाऊल राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उचलले जात असून या संदर्भातील प्रस्ताव देखील पाठवण्यात आलेला आहे.
या महामार्गावर वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात असल्यामुळे अस्तित्वात असलेल्या लेनमध्ये आणखी वाढ करण्याची गरज निर्माण झाली असून राज्य सरकारने या एक्सप्रेस वे वर सहा लेन असून ते आता आठ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातल्या त्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्वपूर्ण प्रस्ताव तयार केला आहे व हा प्रस्ताव नवीन काही बोगद्यांचा आहे.
दोन ठिकाणी नवीन बोगदे करण्यात येणार असून या दोन्ही बोगद्यांमध्ये आठ पदरी रोड असणार आहे. हे दोन्ही नवीन बोगदे बोरघाटामध्ये करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी अडीच हजार कोटी रुपयांचा खर्च लागण्याची शक्यता आहे. संबंधित बोगद्यांचा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यास एक मोठी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
साधारणपणे 2002 मध्ये हा महामार्ग सुरू करण्यात आला होता व आता तब्बल 22 ते 23 वर्षानंतर त्या महामार्गाचा विस्तार करण्याची गरज निर्माण झाली असून तसेच नवी मुंबईतील नवीन विमानतळ आता सुरू होणार असल्यामुळे देखील या महामार्गावर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमएसआरडीसीचा हा प्रस्ताव खूप फायद्याचा ठरेल अशी शक्यता आहे.