Fertilizer Subsidy: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय! शेतकऱ्यांना आता खतावर देखील मिळणार शंभर टक्के सबसिडी, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
fertlizer subsidy

Fertilizer Subsidy:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात व अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीच्या विविध कामांकरिता अनुदान स्वरूपामध्ये मदत केली जाते. जर आपण शेतीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पिकांसाठी खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते

आणि पिकांचा उत्पादन खर्चाचा एकूण विचार केला तर सर्वात जास्त खर्च हा रासायनिक खतांवर होत असतो अशी परिस्थिती आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 शेतकऱ्यांना खतांवर मिळणार 100% सबसिडी

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्याकरिता आणि शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा याकरिता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरिता खड्डे खोदणे तसेच ठिबक सिंचन खरेदी याकरिता शंभर टक्के अनुदान मिळते. परंतु आता याच योजनेच्या माध्यमातून फळबागांसाठी जे काही आवश्यक खते आहेत त्याकरता देखील आता 100% अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत कोणत्या फळपिकांचा आहे समावेश?

शेतकऱ्यांना फायद्याची असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत सन 2023-24 पासून आंबा, डाळिंब, काजू, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभूळ, कोकम, फणस, कागदी लिंबू, नारळ, चिकू, संत्रा, मोसंबी आणि अंजीर या 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला असून

आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून ठिबक सिंचन ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक असलेल्या खतांसाठी 100% अनुदान देण्यात येणार असून याकरिता अर्थसंकल्पामध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe