अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहर शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी आज एका पत्रकाद्वारे माजी आमदार अनिल राठोड यांच्यावर जोरदार टीका करत राठोड यांच्या विधानसभेतील पराभवाचे कारणही या प्रत्रकातून सांगितले आहे.
नगरसेवक नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी सांगितले आहे कि, आज भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे. या परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या गरीब नागरिकाने माजी आ. अनिल राठोड यांना मदतीसाठी फोन केल्यावर एका लोकप्रतिनिधीविषयी त्यांच्या तोंडी असलेली भाषा निंदनीय व अशोभनीय आहे.
यावरुन तुम्हाला या भागातील मागासवर्गीय समाजाविषयी असलेले बेगडे प्रेम हे त्या क्लीपमधून या भागातील नागरिकांना आणि माझ्या समाज बांधवांना समजले आहे. आपण तोंड पाहून खाण्याचे पाकीट वाटतात. तुम्ही गरीबांना अन्न वाटप करताना देखील राजकारण करताना दिसून आले आहे.
मी दलित समाजातील नगरसेवक असल्यामुळे माजी आमदाराकडून अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे दिसून येते. या वक्तव्यामुळे संपूर्ण आंबेडकर जनतेकडून माजी आमदाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. माजी आमदार अनिल राठोड यांनी अहमदनगर शहरात नेहमीच जाती-पातीचे राजकारण करुन समाजात वाद निर्माण करण्याचे काम केले आहे.
अशा कामात पटाईत असलेल्या माजी आमदाराने आता देखील अशाच प्रकारे दलित समाजाच्या दोन तरुणांना हाताशी धरून निवेदन देण्यास गेलेल्या समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले आहे. मी व माझे सहकारी नगरसेवक हे अनिल शिंदे यांच्याबरोबर विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी गेलो होतो. याचा राग आजही माजी आ. अनिल राठोड यांनी मनात धरला आहे व त्या भावनेतूनच त्यांनी हे वक्तव्य केले असल्याचे दिसून येते.
अनिल शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी शिवसेना पक्षाची विधानसभेची उमेदवारी मागितली होती. दुसऱ्या कुठल्याही पक्षाची नाही, नगरच्या सभेमध्ये स्वतः शिवसेनाप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितले होते की, मी ज्या उमेदवारास उमेदवारी देईल, त्याचे काम सर्वांनी प्रामाणिकपणे करायचे आहे. त्यानुसार आम्ही ते आमच्या भागात पक्षाचे उमेदवार अनिल राठोड यांच्यासाठी केले आहे.
हे सर्व नगरकरांनी पाहिले आहे. आपणास आठवण करुन देऊ इच्छितो, तुमचा पराभव तुमच्या नियोजनाअभावी व हेकेखोरपणामुळे झाला आहे. त्याचे खापर कोणत्याही नगरसेवकावर फोडणे योग्य नाही. शिवसेना हा पक्ष वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा आहे.
तो कोणाच्या मालकीचा नाही. त्या रेकॉर्डींगमध्ये तुम्ही म्हणताय की, मी तुला निवडून आणले आहे. माझ्यामुळेच तू निवडून आला. मी आपणास सांगू इच्छितो की, माझा महापालिकेतला विजय हा शिवसेनामुळे झाला आहे. इतर तुमच्या कोणामुळे नाही. शिवसेना पक्ष हा कोणाच्या मालकीचा नाही. ज्यांना स्वतःच्या मुलाचा पराभव रोखता आला नाही, ते मला काय निवडून आणणार.अश्या शब्दात नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी माजी आमदार राठोड यांच्यावर निशाना साधला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com