Money doubling stocks : 30 दिवसांत पैसे दुप्पट करणारे शेअर्स, जाणून घ्या…

Sonali Shelar
Published:

Money doubling stocks : जर तुम्ही सध्या कमी कालावधीत जास्त परतावा देणारे शेअर्स शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, आज आम्ही तुमच्यासाठी अशा शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही अवघ्या एका महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करू शकता. चला तर मग कोणते आहे ते शेअर्स पाहूया…

गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा सुमारे दीड टक्‍क्‍यांच्या आसपास असताना, या काळात अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. अशा टॉप ५ स्टॉक्सबद्दल जाणून घेऊया.

-डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेडचा शेअर महिन्यापूर्वी 139.09 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 349.25 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या स्टॉकने अवघ्या एका महिन्यात सुमारे 151.10 टक्के परतावा दिला आहे. तुम्ही येथे गुंतवणूक करून चांगला परतावा कमावू शकता. तुम्ही गुंतवणुकीसाठी या शेअरचा विचार करू शकता.

-टाईन ॲग्रोचा शेअर महिन्यापूर्वी १७.३९ रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 42.33 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या शेअरने अवघ्या एका महिन्यात सुमारे 143.42 टक्के परतावा दिला आहे.

-एनएमएस रिसोर्सेस ग्लोबलचा शेअर महिन्यापूर्वी 22.71 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 55.05 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या स्टॉकने अवघ्या एका महिन्यात सुमारे 142.40 टक्के परतावा दिला आहे.

-गुजरात पेट्रोसिंथेसिस लिमिटेडचा शेअर महिनाभरापूर्वी 37.70 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 88.60 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या शेअरने केवळ एका महिन्यात सुमारे 135.01 टक्के परतावा दिला आहे.

-आज एक महिन्यापूर्वी, GVK पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा शेअर 4.41 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 9.84 रुपयांच्या पातळीवर आला आहे. अशाप्रकारे या समभागाने केवळ एका महिन्यात सुमारे 123.13 टक्के परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe