Epfo Update: आता नाही होणार तुमचा पीएफ क्लेम परत परत रिजेक्ट! ऑनलाइन प्रक्रियेत करण्यात आला बदल

Ajay Patil
Published:
epfo update

Epfo Update:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही एक महत्त्वाची संस्था असून या माध्यमातून सरकारी आणि बरेच खाजगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंड अर्थात ईपीएफचे नियमन केले जाते. ईपीएफओ च्या माध्यमातून कर्मचाऱ्यांकरिता अनेक प्रकारच्या सोयी सुविधा देखील आता उपलब्ध करून देण्यात आले असून बरीच कामे आता ऑनलाईन पद्धतीने करता येतात.

यातीलच एक महत्त्वाचे म्हणजे  तुमचे पीएफचे पैसे काढणे हे देखील आता ऑनलाईन पद्धतीने करता येते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव असेल की खातेदारांना बऱ्याचदा पीएफचे पैसे काढण्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात. आपण केलेला क्लेम वारंवार रिजेक्ट केला जातो. परंतु आता ही समस्या राहणार नाही. कारण याकरिता नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत.

 पीएफ क्लेम आता नाही होणार रिजेक्ट

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, एपीएफो सदस्यांना ईपीएफचे पैसे काढताना बऱ्याचदा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात आणि वारंवार क्लेम रिजेक्ट केला जातो. परंतु आता ईपीएफओ सदस्यांचे क्लेम आता एकापेक्षा जास्त वेळा रिजेक्ट केला जाणार नाही व दाखल करण्यात आलेल्या क्लेमचा निपटारा विहित वेळेमध्येच करण्यात यावा असे देखील आता अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

बऱ्याचदा क्लेम करून देखील पैसे देण्यास बराच उशीर केला जातो तसेच काही दावे विशिष्ट कारणांमुळे नाकारले जातात. बऱ्याचदा दावे विशिष्ट कारणास्तव नाकारले जातात आणि जेव्हा दुरुस्ती करून ते पुन्हा सादर केले जातात तेव्हा नंतर ते इतर वेगवेगळ्या कारणांकरिता फेटाळले जातात. परंतु आता ईपीएफओसी संबंधित जे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांना आता कोणताही दावा फेटाळला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

 ईपीएफओचे सभासद ईपीएफचे पैसे केव्हा काढू शकतात?

पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा झालेले असते ती रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे काढता येऊ शकते. यामध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यास किंवा सलग दोन महिन्यापेक्षा तो जास्त वेळ बेरोजगार असेल तर खात्यातून तुम्हाला पीएफ फंड काढता येतो व दुसरे म्हणजे मेडिकल इमर्जन्सी, लग्नात व गृह कर्ज इत्यादी करिता देखील तुम्ही रक्कम काढू शकता. ऑनलाइन पद्धतीने पीएफ काढता येतो व याकरिता सदस्याला त्याचा यूएन क्रमांक आणि पासवर्ड सह पीएफ पोर्टलवर लॉगिन करणे गरजेचे असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe