Success Story: स्वतःच्या आजारी मुलाला पाहून सुचली व्यवसायाची कल्पना! आज आहे 1100 कोटीची कंपनी, वाचा महेश गुप्ता यांचा प्रवास

Ajay Patil
Published:
mahesh gupta

Success Story:- गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि आरामशीर चाललेले आयुष्य सोडून उगीचच कुणीतरी जोखीम पत्करून वेगळा मार्ग धरत नाही. परंतु काही समाजामध्ये असे अवलिया व्यक्ती दिसून येतात की त्यांना जे साध्य करायचे असते ते करण्यासाठी ते कितीही सुखाचा मार्ग राहिला तरी तो सोडतात आणि जोखीम पत्करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करतात.

तसेच काही व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठ्या व्यवसाय कल्पना सुचतात व त्या व्यवसाय कल्पनांना ते मूर्त स्वरूप देखील येतात व कोटींचा व्यवसाय उभा करतात. अशा दोन्ही प्रकारचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजात सापडतील. याच मुद्द्याला धरून जर आपण केंट आरो वाटर प्युरिफायर या कंपनीची उभारणीचा इतिहास पाहिला तर तो काहीसा असाच आहे. या कंपनीचे मालक महेश गुप्ता यांनी कशा पद्धतीने केंट आरोची उभारणी केली याबद्दलची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 महेश गुप्ता यांचा जीवन प्रवास

महेश गुप्ता यांचा जन्म 24 सप्टेंबर 1954 रोजी दिल्ली या ठिकाणी झाला. सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेले महेश गुप्ता हे लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय हुशार होते. त्यांचे वडील देखील अर्थ मंत्रालयामध्ये सेक्शन ऑफिसर या पदावर होते. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे पाच भाऊ  बहिणी असलेले संपूर्ण कुटुंब दिल्लीत एका छोट्या घरामध्ये राहायचे व त्यामध्ये महेश गुप्ता यांनी लोधी रोड या ठिकाणी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

संघर्ष करत त्यांनी कानपूर आयआयटी मधून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी मिळवली व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून येथे पेट्रोलियम मध्ये मास्टर्स केले व इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये नोकरी स्वीकारली. चांगल्या पगाराची सरकारी नोकरी हाती असताना मात्र महेश गुप्ता यांच्या डोक्यात स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा असे कायम सुरू असायचे व यातूनच त्यांनी 1988 मध्ये नोकरीला रामराम ठोकला.

परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये महेश गुप्ता यांच्या मुलाला बऱ्याचदा काविळीचा त्रास व्हायचा व कावीळ हा खराब पाण्यामुळे होतो व त्यामुळे तो आजारी पडत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले. या प्रसंगावरूनच त्यांना केंट आरो सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. मुलाला चांगले स्वच्छ पाणी मिळावे व त्याचा कावीळचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने त्यांनी वॉटर प्युरिफायर विकत घेतले.

परंतु त्यांनी विकत घेतलेले हे आरो अल्ट्राव्हााईट तंत्रज्ञानावर आधारित होते व त्यामध्ये पाणी पूर्ण स्वच्छ होत नाही असे निरीक्षण त्यांनी केले. स्वतः अभियांत्रिकी पदवीधर असल्यामुळे त्यांना याबद्दलची बरीच माहिती होती व त्यामुळेच त्यांच्या मनामध्ये आले की जर रिव्हर्स कॉस्मोसिसवर  आधारित वॉटर प्युरिफायर बनवले तर चांगले राहिल व या मधूनच त्यांना केंट आरोची कल्पना सुचली व ती प्रसिद्ध देखील झाली.

त्यामुळे त्यांनी 1998 यावर्षी आरोचे उत्पादन सुरू केले व कंपनीला केंट आरओ नाव ठेवले. 1998 मध्ये एक आरो 20000 रुपयांपर्यंत मिळत होता व महेश गुप्ता यांचा आरो इतर बाजारातील आरओ पेक्षा महाग होता. परंतु त्यांनी केंट आरोमध्ये ज्या काही सुविधा दिलेल्या होत्या त्यावर लोकांचा खूप विश्वास होता व त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढला.

 हेमा मालिनी यांना बनवले ब्रँड अँबेसिडर

कुठलाही व्यवसायाच्या यशामागे त्या व्यवसायाचे मार्केटिंग करणे खूप गरजेचे असते व ही बाब महेश गुप्ता यांना माहिती होती म्हणून त्यांनी त्यांच्या केंट आरो या उत्पादनाच्या मार्केटिंग करिता हेमामालिनी या प्रसिद्ध अभिनेत्रींना ब्रँड अँबेसिडर बनवले व एवढेच नाही तर क्रिकेटच्या स्पॉन्सरशिप साठी देखील पैसे इन्व्हेस्ट केले.

त्यांच्या मार्केटिंगच्या प्रयत्नामुळे टीव्ही पासून ते वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या ठिकाणी केंट आरोच्या जाहिराती दिसू लागल्या. अशा पद्धतीने अवघ्या पाच हजार रुपये भांडवला पासून सुरू झालेली केंट आरो ही कंपनी आता 1100 कोटी रुपयांची झाली आहे. अशा पद्धतीने महेश गुप्ता यांनी एका छोट्याशा प्रसंगावरून व्यवसाय करायचे ठरवले व मोठ्या संघर्षाने आणि नियोजनाने आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात केंट आरो प्रसिद्ध केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe