Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील महादेववाडी शिवारात एका व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्या नंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सोमवार दि. २५ रोजी रात्री उशिरा अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पुढील तपासासाठी पुणे जिल्ह्यात पोलिस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लोणी व्यंकनाथ गावचे पोलिस पाटील मनेश जगताप यांनी श्रीगोंदा पोलिसांना लोणी व्यंकनाथ येथील महादेववाडी रोडवर पुलाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात एका व्यक्तीचा अर्धवट जळलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे सांगितले.
त्या नुसार पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मयत इसमाचा दोरीने गळा आवळून ठार मरून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला असल्याचे सांगत मयताच्या अंगावर असलेल्या टॅटू च्या सहाय्याने मयत इसमाची ओळख काढण्याचा प्रयत्न श्रीगोंदा पोलिस करत आहे.