अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्याकामी तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक,
श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.
त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात आली आहे.
नायब तहसीलदार (महसुल), मोटार वाहन निरिक्षक, आगार व्यवस्थापक आणि वैदयकिय अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल. ही समिती एक खिड़की कक्षांतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करणार आहे.
यामध्ये, परराज्यात जाणा-या मजुरांची नोंद घेऊन त्यांच्या राज्यनिहाय याद्या तयार करणे, त्यास मान्यता देणे आणि मान्यता प्राप्त यादीतील मजुरांची वैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे आदी जबाबदारी असणार आहे.
याशिवाय, मजुरांच्या संख्येनुसार सामाजिक अंतर (5ocial distancing) चे पालन करुन बसेसची संख्या निश्चित करणे, आगार व्यवस्थापकांनी तात्काळ मोफत बसेस उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे,
प्रवाश्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खात्री करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्याची कार्यवाही करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com