राहुरी | बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ३ जूनपासून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
बहुजन वंचित आघाडी ही निवडणूक लढवणार आहे. राहुरी खुर्द येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भावनिक मुद्दा करून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काहींच्या हलचाली सुरू आहेत.
तथापि, हे चित्र लोकशाही तत्त्वात न बसणारे असून ओबीसी जागेवर खऱ्या वंचित ओबीसी समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, असे या वेळी सांगण्यात आले.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रा. किसन चव्हाण आणि अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात कार्यरत आहे
गटातील अनेक समस्या सोडवण्यासाठी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
वनजमीन, भूमिहीन, दुष्काळी अनुदान, वावरथ जांभळी पूल, पिण्याचे पाणी आदी प्रश्नांवर लढे देत असल्याने या जागेवर आपला हक्क सांगून ती लढवण्याची भूमिका संघमित्रा विद्यार्थी आश्रमात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी जाहीर केली.