Agri Business Idea: गांडूळ खताचा व्यवसाय करून होता येईल लवकर लखपती! अशा पद्धतीने तयार करा समृद्ध गांडूळ खत

Ajay Patil
Published:

Agri Business Idea:- शेतीमधून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर खत व्यवस्थापन खूप गरजेचे असते. व्यवस्थित खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून भरघोस उत्पादनाला खूप मोठा आधार मिळत असतो. खतांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यासोबतच शेणखताचा वापर देखील खूप महत्त्वाचा ठरतो.

परंतु हल्लीच्या कालावधीमध्ये शेतीत सेंद्रिय शेती पद्धती ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागले असून जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांच्या वापराला महत्व नसून त्या ऐवजी शेणखत, लेंडीखत तसेच पोल्ट्री खत आणि गांडूळ खताच्या वापराला खूप मोठे प्राधान्य देण्यात येते.

यापैकी जर आपण गांडूळ खताचा विचार केला तर सेंद्रिय शेतीमध्ये या खताला खूप मोठे महत्त्व असून  सेंद्रिय शेती आणि भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून गांडूळ खत खूप महत्त्वाचे आहे. शेतीतील भरघोस उत्पादनाकरिता महत्त्वाचे असलेले हे खत तुम्ही तयार करून त्याची इतर शेतकऱ्यांना विक्री करून देखील खूप मोठ्या प्रमाणावर शेतीला जोडधंदा उभारू शकतात व या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवू शकतात. याच दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण गांडूळ खत कसे तयार करावे याबद्दलची माहिती घेणार आहोत.

 अशा पद्धतीने तयार करावे गांडूळ खत

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गांडूळ खत तयार करण्यासाठी जागेची निवड उत्तम असणे खूप गरजेचे आहे. याकरता पाण्याची निचरा होणारी जमीन असणे गरजेचे आहे तसेच गांडूळ खतासाठी करत असलेल्या खड्ड्यांच्या जवळ कोणत्याही प्रकारची मोठी झाडे नसावीत. अशी मोठी झाडांची मुळे खतामधील पोषक घटकांचे शोषण करतात.

तसेच जागेवर सावली असणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शेड केले तर खूप फायद्याचे ठरते. याकरिता तुम्ही छप्पर किंवा शेड उभारू शकतात व त्याकरिता आठ फूट उंच किंवा दहा फूट रुंद व 32 ते 40 फूट लांब असलेले शेड उभारू शकतात. तसेच आत मध्ये जाणे व येण्यासाठी मोकळी जागा ठेवणे गरजेचे आहे.

 गांडूळ खत कसे तयार करावे?

1- पायरी पहिली तुम्ही जे काही शेड उभाराल त्यामध्ये दोन फूट रुंदी मध्ये मोकळी जागा सोडून त्याच्या दोन्ही बाजूला तीन फूट रुंदीच्या दोन ओळी ठेवणे गरजेचे आहे. पहिल्या पद्धतीमध्ये या दोन ओळींवर उसाचे पाचट, केळीचा पाला किंवा इतर काडीकचरा यांचे तुकडे करावेत व सहा इंच उंचीचा थर द्यावा. कारण या जाड्याभरड्या कचऱ्यामध्ये गांडूळांना आश्रय उत्तम पद्धतीने घेता येतो.

2- दुसरी पायरी किंवा दुसरा थर दुसरा थर हा चांगले मुरलेले किंवा सुकलेल्या स्लरीचा किंवा खताचा द्यावा. उष्णता शोषण्याचे काम या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पार पडते व त्यासोबत साधारण मुरलेले खत टाकले तर गांडूळांना उत्तम पद्धतीचे खाद्य म्हणून ते उपयोगी येते. बीज रूप म्हणून या थरावर तीन बाय 40 फुटासाठी दहा हजार गांडुळे समान पद्धतीने पसरवून घ्यावीत.

3- तिसरी पायरी किंवा तिसरा थर गांडूळ पसरवून झाल्यानंतर त्यावर कचऱ्याचा एक फूट जाडीचा थर टाकावा व त्यावर पुन्हा चार ते पाच इंचाचा कचऱ्याचा थर द्यावा. यावर हलके पाणी शिंपडून ओल्या पोत्याने किंवा गोणपाटाने सर्व थर हे झाकून ठेवावेत.

 गांडूळाच्या खाद्यासाठी कशाचा वापर कराल?

गांडुळांना देखील इतर सजीवांप्रमाणे जगण्यासाठी खाद्याची आवश्यकता असते. यामध्ये कापलेले गवत तसेच झाडाची पाने, काडी कचरा, भाजीपालाचे अवशेष तसेच पालापाचोळा, प्राण्यांची विष्ठा, कंपोस्ट खत तसेच शेणखत, लेंडीखत इत्यादी पदार्थ गांडूळ आवडीने खातात त्यामुळे याचा वापर खाद्य म्हणून करावा.

गांडूळांच्या उत्तम वाढीचा विचार केला तर शेणखतामध्ये त्यांची वाढ चांगली होते व त्यांची संख्या वाढते व गांडूळ खत उत्तम क्वालिटीचे तयार होते. त्यानंतर घोड्याची लीद व लेंडी खत यापासून देखील उत्तम पद्धतीचे गांडूळ खत तयार होते.  गांडूळांकरिता लागणाऱ्या खाद्याचा विचार केला तर ते अर्धवट कुजलेले असणे गरजेचे आहे. तसेच गांडूळांच्या खाद्यासाठी ओला पालापाचोळा तसेच भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांचे अवशेष किंवा साखर कारखान्यातील प्रेसमडचा देखील वापर केला जाऊ शकतो.

परंतु लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे जेव्हा हे खाद्य गांडूळाकरिता वापराल तेव्हा यामध्ये 1:3 या प्रमाणामध्ये शेणखत मिसळून घेणे आवश्यक आहे. तसेच गांडूळांना खाद्य हे नेहमी बारीक करून टाकावे. तसेच बायोगॅस प्लांट मधून जी काही स्लरी निघते त्याचा देखील वापर गांडूळांना खाद्य म्हणून करता येतो.

जेव्हा तुम्ही खड्ड्यांमध्ये गांडूळ टाकाल त्या अगोदर खाद्यावर चार ते पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील उष्णता निघून जाते. यामध्ये बॅक्टेरियल कल्चर वापरून कुजवण्याची प्रक्रिया वेगात करता येऊ शकते. अशा पद्धतीने एक टन खतात अर्धा किलो जिवाणू संवर्धके वापरले तरी फायदा मिळतो.

अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित माहिती आणि आवश्यक प्रशिक्षण घेऊन जर गांडूळ खत तयार करून खत विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच शेतीसोबत तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा मिळणे शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe