SBI Loan:- व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे कमवतात व आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात. परंतु कधीकधी एखाद्या वेळेस अशी काहीतरी इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन परिस्थिती उद्भवते की यामध्ये आपल्याकडे आहे तो पैसा अपूर्ण पडतो किंवा आपल्याकडे पैसाच नसतो. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणावर व्यक्ती समस्येत अडकतो व तो त्यानंतर साहजिकच बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडे कर्ज मागणी करत असतो.
यामध्ये तुमची पात्रता किंवा सदर बँकांच्या अटी-शर्ती तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला कर्ज सुविधा ताबडतोब उपलब्ध करून दिली जाते व तुमची आर्थिक गरज पूर्ण होते. यामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका व एनबीएफसी अशा प्रकारचे लोन सुविधा उपलब्ध करून देतात. अगदी त्याच पद्धतीने आता स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय देखील आपत्कालीन लोन सुविधा देत असून या माध्यमातून तुम्ही या बँकेकडून पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात. याविषयीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया देणार इमर्जन्सी लोन
जेव्हा आपण अनेक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून जास्त रकमेचे कर्ज घेतो तेव्हा आपल्याला जास्तीचा व्याजदर देखील बऱ्याचदा द्यावा लागतो. परंतु तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपत्कालीन कर्ज घेतले तर तुम्हाला ते सात ते दहा टक्क्यांच्या दराने दिले जाते.
या बँकेकडून तुम्ही इमर्जन्सी अर्थात आपत्कालीन दोन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळवू शकतात व त्यावर जास्त व्याजदर देखील द्यावा लागत नाही. याकरिता तुमच्याकडे काही महत्वपूर्ण कागदपत्र असणे गरजेचे असून आधार कार्ड तसेच पॅन कार्ड, बँक अकाउंट स्टेटमेंट, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
साहजिकच तुम्हाला इतर बँकांप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेण्यासाठी काही पात्रता पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. जसे की तुमचे 18 वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे तसेच तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे महत्त्वाचे आहे. तसेच तुम्ही जर अगोदर काही कर्ज घेतले असेल व त्याचे हप्ते तुम्ही वेळेवर भरत असाल तर तुम्हाला स्टेट बँकेच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्ज दिले जाते.
कसे मिळवाल एसबीआयकडून कर्ज?
जर तुम्हाला बँकेकडून आपत्कालीन कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही काही गोष्टी फॉलो करणे गरजेचे आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे….
1- यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा बँकेच्या योनो अँपच्या माध्यमातून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
2- या ठिकाणी एप्लीकेशन करताना तुम्हाला कर्जाचा एक पर्याय त्या ठिकाणी दिसतो व त्यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
3- यामध्ये तुम्हाला पर्सनल लोन हा एक पर्याय दिसेल व या ठिकाणी तुम्ही क्लिक करावे.
4- त्यानंतर ऑनलाइन एप्लीकेशन या पर्यायावर तुम्ही क्लिक करावे.
5- त्यानंतर तुमच्या पुढे अर्जाचा एक फॉर्म ओपन होतो व यामध्ये तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती भरावी लागते. तसेच यामध्ये तुम्ही तुमचे नाव तसेच ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच जन्मतारीख इत्यादी सगळी माहिती भरणे गरजेचे आहे व ही माहिती भरल्यानंतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करावे.
6- त्यानंतर जे काही तुमचे आवश्यक कागदपत्रे विचारले आहेत किंवा लागणार आहेत ते स्कॅन करून अपलोड करावीत. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच बँक अकाउंट नंबर इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते.
7- हे कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करावे.
8- त्यानंतर तुमचा अर्ज बँकेकडून व्हेरिफाय केला जातो व तुम्ही सर्व फॉर्मॅलिटी किंवा अटी किंवा पात्रता पूर्ण करत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये मंजूर कर्जाची रक्कम क्रेडिट केली जाते.
अशा पद्धतीने तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया कडून इमर्जन्सी पर्सनल लोन घेऊ शकतात.