Tips For Become Rich: आघाडीच्या उद्योगपतीने सांगितले करोडपती होण्याच्या टिप्स!वाचा कोणत्या टीप्स सांगितल्या या उद्योगपतीने?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tips For Become Rich:- आयुष्यामध्ये प्रत्येकाला वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा आणि जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याकडे असाव्यात ही प्रत्येकाची इच्छा असते. याकरिताच व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करते व यामधून जितका पैसा कमावता येईल त्यासाठी खूप प्रयत्न करत असते. म्हटले जाते की पैशाशिवाय या जगात काहीही शक्य नाही व हे तितकेच खरे देखील आहे.

परंतु बरेच व्यक्ती पैसा भरपूर कमवतात परंतु त्यांच्याकडे पैसा टिकत नाही किंवा त्यांना तो टिकवता येत नाही असे देखील स्थिती बऱ्याच व्यक्तींची दिसून येते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैसे तुम्ही किती कमवतात याला महत्व नसून तुम्ही कमावलेला पैसा किती बचत करतात किंवा वाचवतात याला खूप महत्त्व आहे. त्यासोबत बचत केलेला पैशाची गुंतवणूक तुम्ही कसे करतात याला देखील तितकेच महत्त्व आहे.

तसेच दुसऱ्या बाजूने विचार केला तर तुम्ही एखादी नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रवेश करत असाल तर त्याकरिता तुमच्याकडे कोणते गुण असणे आवश्यक आहे त्यावर देखील तुमचा करोडपती होण्याचा मार्ग ठरत असतो. याकरिता जर तुम्हाला देखील नोकरी किंवा व्यवसाय करून चांगला पैसा मिळवायचा असेल तर तुम्ही जगातील प्रसिद्ध उद्योगपती आणि अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करणे खूप गरजेचे आहे

कारण माणसाला जीवनात मोठे किंवा यशस्वी होण्यासाठी त्याच्या विचारात आणि त्यानुसार कृतीत बदल होणे खूप गरजेचे असते हे देखील तेवढे महत्त्वाचे असल्यामुळे नेमके जेफ बेझोस यांनी कुठल्या गोष्टी फॉलो करायला सांगितले आहे त्याबद्दलची माहिती घेऊ.

 जेफ बेझोस यांनी सांगितल्या या महत्त्वाच्या टिप्स

1- यशासाठी संयम ठेवा किंवा धीर धरा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट ही पटकन माणसाला मिळत नसते.अगदी त्याच पद्धतीने यश देखील तुम्हाला ताबडतोब मिळत नसते. याकरिता तुम्हाला खूप दीर्घकाळासाठी व्यवस्थित प्लॅनिंग किंवा दृष्टिकोन ठेवून काम करणे गरजेचे असते.

त्यामुळे ॲमेझॉनचे मालक किंवा संस्थापक जेफ बेजोस म्हणतात की यशासाठी व्यक्तीने धीर धरावा असा सल्ला देतात. तसेच महत्त्वाचे म्हणजे यशाकरिता कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट घेण्यावर त्यांचा विश्वास नाही. त्यांचे म्हणणे आहे की तुम्हाला जर मोठे यश मिळवायचे असेल तर त्याकरिता तुमच्याकडे जास्त कालावधीची किंवा दीर्घ कालावधीची प्लॅनिंग असणे गरजेचे आहे व त्याच पद्धतीने बेजोस हे देखील दीर्घकालीन योजना तयार करतात.

2- अपयशाला घाबरू नका जेफ बेजोस म्हणतात की तरुणांनी व्यवसायामध्ये जोखीम स्विकारायला  आणि अपयश येईल याला घाबरता कामा नये. तसेच तरुणांनी स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून काहीतरी नवीन करण्याची उर्मी आणि धैर्य दाखवावे असे देखील ते म्हणतात.

3- लोकांचे ऐकण्यापेक्षा तुमच्या मनाचा आवाज ऐका बेझोस तरुणांना करिअर निवडण्याच्या बाबतीत म्हणतात की तुम्हाला ज्या गोष्टी करण्यात आवड आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही चांगले उत्कृष्ट किंवा पारंगत आहात अशा क्षेत्रामध्येच तुम्ही करिअर निवडावे असा महत्त्वपूर्ण सल्ला ते तरुणांना देतात.

एका मुलाखती दरम्यान त्यांनी म्हटले होते की तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही करा आणि त्या मार्गावर चालायला सुरुवात करा. तसेच ते म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कठीण वेळ येते व अशी वेळ आपल्याला पडायला आणि पुन्हा त्यातून उठायला देखील शिकवते. त्यामुळे जर तुम्हाला जीवनात चांगले यश मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम करण्याशिवाय पर्याय नाही व ते खूप आवश्यक आहे असा सल्ला देखील ते देतात.

जर आपण ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचा प्रवास पाहिला तर त्यांनी स्वतः शून्यातून इतक्या मोठ्या उंचीपर्यंत मजल मारलेली आहे. एका छोट्याशा गॅरेज मधून त्यांनी जगातील प्रसिद्ध आणि आघाडीची ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनची सुरुवात केली होती. त्यांची कामे आजच्या तरुण उद्योजकांना खूप प्रेरणा देणारे आहे. प्रत्येकच व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायातून पैसे कमवायचे असतात व त्यातून करोडपती व्हायचे असते. ही गोष्ट हवी तेवढी सोपी देखील नाही परंतु कठीण देखील नाही असे ते स्वतः सांगतात.  त्यांनी सांगितलेल्या या छोट्या परंतु अतिशय महत्त्वाच्या टिप्स तरुणांना करिअर निवडण्यासाठी व जीवनात यशस्वी व चांगला पैसा मिळवण्यासाठी फायद्याच्या ठरतील.