Women Business Idea: महिलांनो घरी बसून करा ‘हे’ व्यवसाय आणि कमवा लाखात! या बिझनेस आयडिया ठरतील फायद्याच्या

Published on -

Women Business Idea:- पैसा हा प्रत्येकाला लागतो आणि कुटुंबामध्ये जितके जास्त सदस्य पैसे कमावणारे असतील तेवढे पैशांच्या बाबतीत कुटुंब स्वयंपूर्ण होत असते. आता या आधुनिक युगामध्ये पुरुषांसोबत महिला वर्ग देखील मोठ्या पदांवर कार्यरत असून काही महिला या नोकरी करणाऱ्या असल्यामुळे कुटुंबाला खूप मोठा आर्थिक हातभार लागत असतो. परंतु बऱ्याच महिला या घरचे सगळे काम आटोपून त्यांच्याकडे बऱ्यापैकी रिकामा वेळ असतो. त्यामुळे बऱ्याच महिलांच्या मनामध्ये विचार असतो की कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून काहीतरी काम करावे.

परंतु नेमके काम कोणते करावे किंवा कोणता व्यवसाय आपल्याला घरी बसून चांगला पैसा देईल? याबाबतीत गोंधळ होताना दिसतो. महिलांच्या बाबतीत विचार केला तर असे बरेच व्यवसाय आहेत की महिला वर्ग घरी बसून त्यातून खूप चांगल्या पद्धतीचा पैसा कमवू शकतात. त्यामुळेच आपण या लेखांमध्ये महिला वर्गासाठी खास घरी बसून चांगला पैसा मिळेल अशा काही व्यवसायांची माहिती पाहणार आहोत.

 महिलांसाठी घरी बसून चांगला इन्कम देतील हे व्यवसाय

1- घरी लोणचे बनवून त्याची विक्री करणे लोणचे हा प्रत्येकाच्या आहारातील एक खूप आवडीचा पदार्थ असून जवळजवळ प्रत्येकच घरामध्ये लोणचे खाणे आवडते. या अनुषंगाने लोणचे बनवून त्याची विक्री करणे या व्यवसायामध्ये खूप चांगली संधी असल्यामुळे महिला वर्गांला हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने नफा मिळवून देऊ शकतो.

यामध्ये जर तुम्ही घरी बनवलेले लोणचे जर आसपासच्या किराणा दुकानदारांना जरी पुरवले तरी देखील तुम्ही चांगले पैसे मिळवू शकतात किंवा एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही घरपोच ग्राहकांना लोणच्याची सर्विस देऊ शकतात. त्यामुळे लोणचे बनवून त्याची विक्री हा व्यवसाय महिलांसाठी खूप फायद्याचा आहे.

2- मेस किंवा टिफिन सर्विस आपल्याला माहित आहे की शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने बरेच व्यक्ती कुटुंबापासून एकटे शहरांमध्ये राहतात. त्यामुळे हॉटेल पेक्षा घरगुती जेवणाचा आस्वाद मिळावा याकरिता बरेच जण मेसमधून जेवण करतात. अशा पद्धतीने तुम्ही जर अशा लोकांकरिता घरात बनवलेली घरगुती जेवण  बनवले व त्याची विक्री केली तर नक्कीच या माध्यमातून चांगला पैसा मिळतो. फक्त तुमचे घरचे तयार जेवण हे दर्जेदार व चवीने चांगले राहिले तर ग्राहकांपर्यंत आपसुकच त्याची माहिती पोहोचते व तुमचा व्यवसाय वाढतो.

3- सोशल मीडियावर फूड ब्लॉगिंग आपण यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियावर अनेक महिलांचे व्हिडिओ किंवा ब्लॉग पाहतो. यामध्ये अनेक रेसिपीज किंवा इतर अन्नपदार्थांविषयी महत्त्वाची माहिती महिला देत असतात. याच उद्देशाने तुम्ही देखील youtube किंवा रील च्या माध्यमातून अनेक प्रकारच्या रेसिपीज किंवा फूड ब्लॉगिंग च्या माध्यमातून खूप चांगला पैसा मिळवू शकतात.

याकरिता तुम्ही बनवत असलेली रेसिपी तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करावे लागते व हे युट्युब वर अपलोड करून तुमचे सबस्क्रायबर वाढण्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागते. तुमचे सबस्क्रायबर वाढतील व तुमच्या अपलोड व्हिडिओला व्ह्यूज मिळतील तसे तसे तुम्हाला युट्युब कडून पैसे मिळायला सुरुवात होईल. अशा पद्धतीने हा देखील व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने महिला वर्गाला आर्थिक  नफा देऊ शकतो.

4- कॅन्टीनसाठी जेवण बनवणे पॅन्ट्री किंवा कॅन्टीन साठी जेवण बनवणे हा देखील एक चांगला व्यवसाय पर्याय असून तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. यामध्ये तुम्हाला कॅन्टीनच्या माध्यमातून काही निश्चित लोकांची यादी देण्यात येते व त्या लोकांना तुम्ही जेवण बनवून  ते त्यांच्या घरी पाठवावे लागते. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसशी चर्चा करून संबंधित कंपनीच्या कार्यालयामध्ये देखील कॅन्टीन उघडू शकतात व त्या माध्यमातून तयार अन्नपदार्थ विकून चांगला नफा मिळवू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायांच्या माध्यमातून कमीत कमी भांडवलामध्ये अगदी घरी बसून देखील खूप चांगला पैसा मिळवू शकता व तुमच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News