अहमदनगरकरांसाठी आनंदाची बातमी ! जिल्ह्यात 315 किमीचे रस्ते नव्याने तयार होणार, 15 वर्षे टिकतील रस्ते

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर वासियांसाठी खुशखबर आहे. अनेकदा नागरिकांची रस्त्याच्या दुर्दशेबाबत ओरड असते. परंतु आता ही समस्या बहुतांशी मिटणार आहे. त्याचे कारण असे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर्जेदार रस्ते मिळावेत,

यासाठी जिल्ह्यातील ३१५ किलोमीटरचे नवीन रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. या कामाचे प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.

त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचे म्हणजे नगर जिल्ह्यातील १२८६ किलोमीटर रस्त्यांच्या देखभालीसाठी निविदा काढून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झाली आहे.

जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रीय व राज्य महामार्ग या दोन्हीचे कामे आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जिल्ह्यात महत्वाची कामे हाती घेतले आहे.

सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १ हजार ७७३ किलोमीटरचे राज्य मार्ग आणि ४ हजार ६५५ किलोमीटरचे प्रमुख जिल्हा रस्ते यांचा समावेश आहे. अधूनमधून पडणारा पाऊस आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे या ठिकाणी आधी रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,

त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. एकूण १२८६ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या कामास सुरवात झाली आहे. ज्यांनी पूर्वी रस्ते बनवले होते, पण त्या रस्त्यांमध्ये काही सुधारणा असेल तर संबंधित कंत्राटदाराला त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.

त्याअंतर्गत साधारणपणे ५५० किलोमीटरचे रस्तेही दुरुस्त केले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शिरूर ते नगर, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय ते विळद घाट आणि त्यानंतर सर्व बायपास तसेच शिर्डी विमानतळाभोवतीचे रस्ते आदींचा समावेश आहेत.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवजड वाहतूक व इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रस्ते दर्जेदारच व्हावेत या अनुशंघाने पावले उचलण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये एकूण 315 किलोमीटरचे रस्ते नव्याने दर्जेदार करण्यात येणार आहे.

यामध्ये शेवगाव तालुक्यातील तीन रस्त्यांच्या समावेश आहे. राज्य महामार्गाच्या कामांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 40 किलोमीटर, राहता तालुक्यातील लोहारे, अश्वि, मांडवा येथील 67 किलोमीटर, वांबोरी ते शेवगाव 42 किलोमीटर आदी रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

१५ वर्षे टिकतील रस्ते

हे रस्ते पूर्णतः दर्जेदार करण्यात येणार आहेत. हे रस्ते पुढील १५ वर्षे टिकतील असे नियोजन केले आहे. हे रस्ते तयार करताना त्याचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नंतर तो राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवण्यात येणार आहे.

७२ तासात खड्डे न बुजवल्यास ठेकेदारास दंड

जिल्ह्यातील जे रस्ते खराब झालेले आहे, त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे एक वर्षाचे काम संबंधित ठेकेदाराला दिलेले असल्याने 72 तासाच्या आत खड्डा बुजला गेला नाही तर संबंधित ठेकेदाराकडून दंड सुद्धा वसूल केला जाणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe