DA Hike Update: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नवरात्री आणि दिवाळी दरम्यान वाढेल? वाचा ताजी अपडेट

Published on -

DA Hike Update:- केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे महागाई भत्ता वाढ होय. गेल्या कित्येक दिवसापासून महागाई भत्ता वाढीबाबतच्या अनेक बातम्या मीडिया रिपोर्ट मधून सातत्याने येत आहेत. परंतु नेमके या महागाई भत्ता वाढीची घोषणा कधी होणार याबाबत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

परंतु जर आपण विचार केला तर केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या महिन्यांमध्ये महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता असून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला महागाई भत्ता या महिन्यात जाहीर होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर आपण मिळालेल्या वृत्ताचा विचार केला तर या नवरात्री आणि दिवाळीच्या दरम्यान केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीची घोषणा करू शकते. महागाई भत्ता वाढीची घोषणा केल्यानंतर एक जुलै 2023 पासून महागाई भत्त्यातील ही वाढ लागू करण्यात येणार आहे.

 किती टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता?

जर आपण या आधीच्या अहवालांचा विचार केला तर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ सुचवण्यात आली आहे.परंतु यामध्ये आणखी वाढ होईल अशी एक शक्यता आहे. जर मागच्या सहामाहीचा विचार केला तर केंद्र सरकारने चार टक्क्यांनी महागाई भत्ता  वाढवला होता व याप्रमाणे यावेळी देखील चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवला जाईल असा या क्षेत्रातील तज्ञांचा एकंदरीत अंदाज आहे.

महागाई भत्ता हा महागाईचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकारच्या माध्यमातून दिला जातो. तो 42% इतका मिळत असून जर आता त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली तर तो 46% पर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. जर महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाली तर ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू होईल व ती 46% याप्रमाणे दिली जाईल. जर आपण या बाबतीत इटी अहवाल पाहिला तर औद्योगिक कामगारांकरिता नवीन ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई भत्ता गणना सूत्रानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरिता चार टक्के वाढ होण्याची शक्यता असून तो 46 टक्क्यांवर पोहोचेल.

जर आपण महागाई भत्त्यातील सुधारणेचा विचार केला तर सरकारच्या माध्यमातून ती जानेवारी आणि जुलै मध्ये केली जाते. परंतु यावर्षी ही वाढ जाहीर करण्यामध्ये थोडा उशीर झाला आहे. यामध्ये आपण महागाई सवलत व महागाई भत्ता यातील फरक पाहिला तर महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो तर केंद्रीय पेन्शनधारकांना महागाई सवलत दिली जाते. या दोन्ही बाबी वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये त्यात वाढ होते.

महागाई भत्त्याचा विचार केला तर हा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा जो काही पगार आहे त्याचाच एक भाग असतो. वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून तो दिला जातो. तसेच महागाईचा प्रभाव हा कर्मचारी कोणत्या ठिकाणी राहतात त्या स्थानानुसार वेगवेगळा होत असल्यामुळे त्यानुसारच डीएची गणना केली जाते. त्यामुळे तो शहरी किंवा निमशहरी,ग्रामीण भागातील त्यांच्या स्थानानुसार बदलत असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News