Top 5 Upcoming Cars : Tata Harrier, Safari Facelift सह ऑक्टबरमध्ये लॉन्च होतायेत ‘या’ पाच कार

Published on -

Top 5 Upcoming Cars : ऑटोमोटिव्ह मार्केट दिवसेंदिवस व्यापक होत चालले आहे. नवनवीन व सर्वोत्तम फीचर्स असणारी कार मार्केटमध्ये येत आहेत. आता ऑक्टोबरमध्ये अनेक नवीन मॉडेल्स बाजारात दाखल होणार आहेत.

तुम्हीही जर नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर या महिन्यात लाँच होणाऱ्या काही टॉप कारची माहिती याठिकाणी पाहुयात –

1. Citroen C3 Aircross

या वर्षी एप्रिलमध्ये समोर आलेल्या Citroën C3 Aircross अद्याप अधिकृतपणे लाँच झालेली नाही. कंपनीने गेल्या महिन्यात SUV च्या बेस वेरिएंटच्या किमती जाहीर केल्या होत्या, तथापि, C3 Aircross च्या इतर व्हेरियंटच्या किमती अजून उघड झालेल्या नाहीत. 15 ऑक्टोबरपासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हा संपूर्ण लाइनअपच्या किंमती जाहीर केल्या जातील.

2. Nissan Magnite AMT, Kuro Edition

निसानने मागील काही दिवसांपूर्वी मॅग्नाइटच्या कुरो एडिशनचा टीझर रिलीज केला होता आणि सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये एएमटी गिअरबॉक्सची पुष्टी केली होती. कुरो एडिशन मुळातच मॅग्नाइटची स्पोर्टियर दिसणार व्हर्जन आहे. कुरो एडिशन ७ ऑक्टोबरला लॉन्च होईल तर मॅग्नाइटचा AMT व्हेरिएंट १२ ऑक्टोबरला लॉन्च होईल.

Nissan Magnite AMT, Kuro Edition

3. Tata Harrier, Safari facelift

टाटा मोटर्सने नुकतेच हॅरियर आणि सफारीच्या फेसलिफ्ट व्हर्जनचे टीझर रिलीज केले आहेत. यात एक्सटीरियर आणि इंटीरियर अशा दोन्ही प्रकारचे कॉस्मेटिक अपडेट मिळतील. याशिवाय नवीन हॅरियर आणि सफारीमध्येही काही नवे फीचर्स देण्यात येणार आहेत. ही या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

4. Lexus LM

नवीन जनरेशनची टोयोटा वेलफायरवरची नवीन लेक्सस एलएम लक्झरी एमपीव्ही या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार 4 सीटर आणि 7 सीटर अशा दोन कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. एलएममध्ये 2.5 लीटर, 4-सिलिंडर सेल्फ-चार्जिंग हायब्रिड पॉवरट्रेन असेल.

 

5. Tata Punch EV

टाटा मोटर्स अनेक दिवसांपासून पंच च्या ऑल-इलेक्ट्रिक डेरिव्हेटिव्ह्सची चाचणी घेत आहे. कंपनी ऑक्टोबरच्या अखेरीस पंच ईव्ही लाँच करण्याची शक्यता कमी असली तरी तशी आशा ठेवण्यास हरकत नाही. ही ईव्ही ज़िपट्रॉम पॉवरट्रेन तंत्रज्ञानावर आधारित असेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe