Snake Information: ‘हे’ आहेत भारतातील सर्वात विषारी साप! जर चावले तर काही क्षणात होतो मृत्यू

Published on -

Snake Information:- जगाचा आणि एकंदरीत भारताचा विचार केला तर सापांच्या अनेक प्रजाती आढळून येतात. परंतु या प्रजातींमध्ये  बोटावर मोजणे इतके साप हे विषारी किंवा अति विषारी आहेत. जगात आणि भारतात दरवर्षी जर आपण सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचा विचार केला तर तो आकडा लाखाच्या घरात आहे.

याबाबतीत डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 80 ते दीड लाख लोकांचा यामुळे मृत्यू होतो. जगाच्या पाठीवर अनेक विषारी सापांच्या जाती आहेत परंतु भारतात तील जर आपण विषारी किंवा अति विषारी सापांची माहिती घेतली तर यामध्ये पाच सर्वाधिक विषारी साप आहेत. याच पाच विषारी असलेल्या सापांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 भारतातील पाच अतिविषारी साप

1- इंडियन क्रेट सापाची ही प्रजात सर्वात विषारी साप म्हणून गणली जाते. जर आपण या सापाचा विचार केला तर जर या सापाने चावा घेतला तर एकाच वेळी बाहेर पडणारे विष हे 60 ते 70 लोकांचा जीव घेऊ शकते. इतका हा साप विषारी आहे.

तसेच या सापाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जास्त करून रात्री झोपलेल्या लोकांना चावतो व प्रामुख्याने व्यक्तीचे पाय किंवा तोंड तसेच हात डोक्यावर प्रामुख्याने चावा घेतो. जर या जातीच्या सापाचे वैशिष्ट्ये पाहिले तर हा साप चावल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाही व झोपेतच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

Common krait - Wikipedia

2- किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब विषारी साप म्हणून ओळखला जातो व 18 फूट पर्यंत याची लांबी असते. जर या सापाने चावा घेतला तर एका चाव्याने सात मिली लिटर विष शरीरामध्ये जाते व काही मिनिटात  व्यक्तीचा मृत्यू होतो.

King cobra - Wikipedia

3- इंडियन कोब्रा किंग कोब्रा प्रमाणे भारतात आढळणारा इंडियन कोब्रा हा देखील खूप विषारी साप आहे व त्यालाच आपण नाग या नावाने देखील ओळखतो. जर आपण भारताचा विचार केला तर सर्व भागांमध्ये हा आढळून येतो. जर याची शरीर रचना पाहिली तर याची लांबी एक ते दीड मीटर पर्यंत असते म्हणजेच फुटात विचार केला तर साडेतीन ते साडेचार फुटापर्यंत याची लांबी असू शकते. हिंदू धर्मामध्ये या सापाची पूजा केली जाते.

Indian Cobra, cobra, reptile, snake, indian, HD wallpaper | Peakpx

4- रसेल वायपर भारतातील अनेक राज्यांमध्ये आढळणारी सापाची ही प्रजात असून या सापाच्या चावामुळे जगाचा विचार केला तर 58000 लोक मृत्युमुखी पडतात. दक्षिण भारत आणि श्रीलंकामध्ये भाताच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना हा साप चावल्याच्या घटना घडून येतात. रसेल वायपर प्रजातीच्या सापाने जर चावा घेतला तर त्याच्या विषामुळे किडनी फेल होण्याचा धोका संभवतो व लवकर उपचार मिळाले नाही तर मृत्यू देखील होतो.

Russell's Viper | Rahul Alvares

5- सॉस्केल्ड वायपर ही सापाची प्रजात देखील खूप विषारी आहे. लांबीला हा साप खूप लहान असतो परंतु त्याचा वेग आणि त्याची चपळता अतिशय जास्त असते व तो आक्रमक वृत्तीचा साप आहे. या सापाने जर चावा घेतला तर माणसाचा मृत्यू ओढवू शकतो व या सापाच्या चाव्यामुळे काही हजार लोकांचा मृत्यू दरवर्षी होत असतो. हा साप देखील खूप विषारी आहे.

Saw Scaled Viper" Images – Browse 157 Stock Photos, Vectors, and Video |  Adobe Stock

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News