Ahmednagar News: नगरमध्ये तब्बल 315 किमीचे रस्ते होतील चकाचक! डीपीआर तयार करण्याचे काम सुरू, वाचा कसा आहे प्लॅन?

Ajay Patil
Published:
ahemednagar news

Ahmednagar News:- रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त असणे हे सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून तसेच जलद वाहतुकीसाठी खूप महत्त्वाची बाब आहे. परंतु आपण पाहतो की बऱ्याच शहरांमधील किंवा जिल्ह्यांमधील रस्त्यांची अवस्था खूप दयनीय झालेली असते व पावसाळ्यामध्ये यामध्ये भर पडते. त्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यायला लागते व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बऱ्याचदा जीवघेणा अपघात देखील घडून येतात व प्रवाशांचा जीव देखील जातो.

या दृष्टिकोनातून रस्त्यांची कामे हे दर्जेदार होणे खूप गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून जर आपण नगर जिल्ह्याचा विचार केलेला तर  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आता नगर जिल्ह्यामध्ये तब्बल नवीन 315 किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत व त्याचा डीपीआर अर्थात प्रकल्प अहवाल देखील तयार केला जात आहे. याबाबतचे महत्त्वाचे अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.

 नगर जिल्ह्यातील नवीन होणार 315 किलोमीटरचे रस्ते

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नगर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने 315 किलोमीटरच्या रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून त्यासंबंधीचा डीपीआर देखील तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली आहे. त्यासोबतच 1286 किलोमीटर रस्त्यांचे देखभाल व त्यांची दुरुस्ती करिता टेंडर काढून प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात झालेली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाच्या संदर्भात बरीच कामे आता सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत आहे. मध्यंतरी जो काही पाऊस पडला त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झालेली होती व त्या त्यांची अगोदर देखभाल व दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता व त्यानुसार आता 1286 किलोमीटरचे रस्ते हे दुरुस्त केले जाणार आहेत व त्याचे निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली आहे.

पीडब्ल्यूडीकडे सध्या शिरूर ते नगर, पोलीस अधीक्षक कार्यालय ते विलद घाट त्यानंतर सर्व बायपास व शिर्डी विमानतळाच्या अवतीभोवतीचे रस्ते इत्यादी रस्त्यांचा समावेश आहे. सध्या नगर जिल्ह्यातील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून दर्जेदार रस्ते मोठ्या प्रमाणावर व्हावे त्याकरिता पावले उचलण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता 315 किलोमीटरचे रस्ते नवीन होणार आहेत.

या तीनशे पंधरा किलोमीटर मध्ये आता शेवगाव तालुक्यातील तीन रस्त्यांचा समावेश असून राज्य महामार्गाच्या या कामांमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील 40 किलोमीटरचे रस्ते देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राहता तालुक्यातील लोहारे, आश्वी व मांडवा येथील 67 किलोमीटरचे रस्ते व बांबोरी ते शेवगाव हा 42 किलोमीटरचा रस्ता याचे देखील नियोजन या 315 किलोमीटर मध्ये करण्यात आलेले आहे.

हे रस्ते आता पूर्ण दर्जेदार करण्यात येणार असून यासाठी रस्ता खोदून त्यानंतर नव्याने या रस्त्याची प्रक्रिया केली जाणार आहे व भविष्यामध्ये हे रस्ते पंधरा वर्षे टिकतील अशा प्रकारचे एकंदरीत पीडब्ल्यूडीने नियोजन केलेले आहे. त्यांचा डीपीआर आता तयार करण्यात येत असून तो राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यातील जे राज्य महामार्ग व इतर रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्यांच्या दुरुस्ती व कामाकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील झालेली आहे. त्यामध्ये एक वर्षाचे काम ठेकेदारांना देण्यात आलेले आहे व यामध्ये  जर या तयार रस्त्यांवर ७२ तासाच्या आत जर खड्डा बुजला नाही तर संबंधित ठेकेदाराकडून दंड सुद्धा वसूल केला जाईल अशी देखील तरतूद या निविदा प्रक्रियेमध्ये करण्यात आल्याची महिती पीडब्ल्यूडी चे अधीक्षक अभियंता बाविस्कर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe