अहमदनगर ब्रेकिंग : मुलीवरील अत्याचार प्रकरणातील फरार कॅफे चालकास अटक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी कॅफे मॅझिकच्या चालकास पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अखेर काल अटक केली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की संगमनेर तालुक्यात राहात असणाऱ्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीवर आशिष नानासाहेब राऊत (वय २०) व किरण सोपान राऊत (वय ३०, दोघे रा. मालुंजकर मळा, घुलेवाडी, ता संगमनेर) यांनी संगमनेर शहरातील विविध कॅफेवर तसेच शिर्डी, नांदुर शिंगोटे येथील लॉजवर – नेत वारंवार अत्याचार केला होता.

शहर पोलिसांनी या दोघा प्रमुख आरोपींसह त्यांना कॅफे, लॉज उपलब्ध करून देणान्य सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणातील आशिष नानासाहेब राऊत व किरण सोपान राऊत या दोघांसह

नांदूर शिंगोटेचा हॉटेल साईतेजचा मालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर, सावळीविहीर येथील लॉजचा मालक आकाश भास्कर बोंडारे आणि घुलेवाडीतील कॅफे क्रशबसचा मालक राहुल गौतम भालेराव या पाच जणांना यापूर्वीच अटक केली होती.

कॅफे मॅझीक हाऊसचा मालक कन्हैय्या सोनवणे आणि सागर मालुंजकर हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी कसून तपास करत कॅफे मॅझीकचा मालक कन्हैया सोनवणे यास अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe