Top 3 Bank For Fixed Deposit : आताच्या या महागाईच्या जमान्यात जेवढी बचत कराल तेवढीच तुम्हाला ती भविष्यासाठी उपयोगी ठरते. बरेच जण सुक्षित गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात तर काही जण जोखमीच्या म्हणजेच म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करतात. बरेचजण बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतात, कारण येथील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
अशातच तुम्ही देखील सध्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगला परतावा देणाऱ्या बँका शोधणे फार गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच तीन बँका सांगणार बद्दल आहोत जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे.
उत्तम परतावा देणाऱ्या टॉप 3 बँका :-
कॅनरा बँक
सध्या कॅनरा बँक एफडीच्या बाबतीत आघाडीवर आहे. तुम्ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD केल्यास, ही बँक आपल्या ग्राहकांना 4% ते 7.25% पर्यंत व्याज देते. याशिवाय कॅनरा बँक वेळोवेळी अनेक योजनाही देते. जर तुम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारी बँक शोधत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय एकदम उत्तम आहे.
पीएनबी बँक
कॅनरा बँकेनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पीएनबीची पाळी येते. PNB आपल्या ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर 3.50 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते. घोटाळा उघडकीस आल्यापासून, PNB ने आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत, ज्यामुळे आता कोणीही या बँकेसोबत पूर्ण आत्मविश्वासाने जाऊ शकतो.
आयसीआयसीआय बँक
शेवटी, खाजगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक ICICI आहे. ICICI ने आपल्या उत्कृष्ट सेवेद्वारे आपल्या ग्राहकांना आनंदित केले आहे. FD बद्दल बोलायचे झाले तर ICICI बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी बचतीवर 3% ते 7.10% पर्यंत व्याज देते. तर या 3 बँका आहेत जिथे तुम्ही तुमच्या FD साठी जाऊ शकता.