Post Office Schemes : तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्टाच्या या गुंतवणुकीत तुम्ही जास्तीत जास्त परतावा मिळवू शकता. येथे तुम्ही अगदी कमी गुंतणूक करून जास्त परतावा मिळवू शकता.
लोकांच्या गरजेनुसार पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना सुरू करते. अशीच एक बचत योजना म्हणजे किसान विकास पत्र. ज्यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे केवळ 115 महिन्यांत दुप्पट होतील. जोखीममुक्त योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय खूप चांगला ठरू शकतो. किसान विकास पत्र नावाच्या या योजनेत गुंतवणूक करणार्या कोणत्याही गुंतवणूकदाराला चांगले व्याज तर मिळेलच तसेच दीर्घ मुदतीत पैसे दुप्पट होतील.
तुम्हाला किती व्याज मिळते?
या सरकारी योजनेत ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ७.५ टक्के व्याज दिले जात आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना चक्रवाढीचा लाभही मिळतो, त्यामुळे ही योजना अल्प बचत करणाऱ्यांसाठीही चांगली असल्याचे सांगितले जाते. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी रक्कम तुम्ही गुंतवू शकता.
किती रुपयांची गुंतवणूक करू शकता?
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र योजनेत कोणतीही व्यक्ती फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते. ज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही.
दुप्पट परतावा कसा मिळवायचा ?
जर कोणत्याही गुंतवणूकदाराला त्याचे पैसे दुप्पट करायचे असतील तर किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला जोरदार परतावा मिळेल. जर तुम्ही त्यात दहा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 115 महिन्यांत म्हणजे 9 वर्षे आणि 7 महिन्यांत वीस लाख रुपयांचा परतावा मिळेल. लोकांना कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही मोठा परतावा मिळाला आहे.