BMW New Car : कार विकत घेणं ही काही मोठी गोष्ट नाही. त्याची काळजी घेणं खूप चॅलेंजिंग असतं. जेव्हा तुम्ही कार खरेदी करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या किंमतीची तरतूद करावी लागते. एक तर ते विकत घेणं आणि दुसरं म्हणजे त्याची देखभाल करणं. हा देखभालीचा सर्वात मोठा खर्च असतो. सध्या इंधनाचा खर्च भरमसाठ वाढला आहे.
अशावेळी जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर जास्त मायलेज देणारी कार खरेदी केली पाहिजे. हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळे आपण बचत करू शकता. आता तुम्ही विचार कराल की, 30 किमी / लीटर किंवा 35 किमी / लिटर मायलेज देणारी कार घ्यावी.
पण आता नुकतीच बीएमडब्ल्यूने एक एसयूव्ही लाँच केली आहे जी 62 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देऊ शकते. ही कार खूपच महाग असून यामध्ये प्लग इन हायब्रिड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
BMW ची नवीन कार
बीएमडब्ल्यू SUV XM भारतात लाँच करण्यात आली असून त्याची किंमत 2.6 कोटी रुपये आहे. यात 4.4 लीटर ट्विन टर्बो व्ही 8 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. प्लगइन हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येते. हे इंजिन 653 पीएस पॉवर आणि 800 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 8 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे वाहन 62 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. यात 69 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
फिचर्स :
यात 14.9 इंचाचा कर्व्ड टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फोर झोन क्लायमेट कंट्रोल, हेड अप डिस्प्ले, 12 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 1500 वॅटडायमंड साउंड सिस्टीम, एम्बियंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा, एबीएस विथ एबीएस देण्यात आला आहे.
एअरऑक्स, डायनॅमिक स्टेबिलिटी कंट्रोल उपलब्ध आहे. यात फ्रंट कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग आणि अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल देखील देण्यात आले आहे. बीएमडब्ल्यू एक्सएमचा लूक सुंदर आहे. यामध्ये तुम्हाला बीएमडब्ल्यूची सिग्नेचर ग्रिल पाहायला मिळते, जी आकाराने खूप मोठी आहे.