हृतिक रोशनच्या ‘जादू’ नंतर आता येतोय आणखी एक एलियन्स वर आधारित साऊथचा सिनेमा, पहा..

Ahmednagarlive24
Published:

हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’मध्ये अंतराळातून आलेला एलियन अर्थात जादू तुम्ही अजूनही विसरला नसाल. या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. आता आणखी एक जादू तुमच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. पण तो या जादूपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि जादुई शक्तींनी सुसज्ज असेल.

तमिळ चित्रपट ‘अलयान’ चा टीझर रिलीज होऊन तब्बल 24 तास झाले आहेत. 46 लाख पेक्षा जास्त वेळा तो पाहिला गेला आहे. हा चित्रपट हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होत असून टीझर अतिशय मनोरंजक आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार्सही झळकणार आहेत. यामध्ये रकुल प्रीत सिंह, ईशा कोप्पीकर आणि शरद केलकल यांचा समावेश आहे. या चित्रपटात तमिळ स्टार शिवा कार्तिकेयन मुख्य भूमिकेत आहे.

सिनेमाची कल्पना
हा कल्पनारम्य मनोरंजन चित्रपट पृथ्वीवर एलियनचे आगमन आणि क्रूर वैज्ञानिकांपासून त्याला वाचवणारा नायक यावर आहे. हृतिक रोशनने जादूला वाचवताना ‘कोई मिल गया’मध्ये असेच काही केले होते. या टीझरची सुरुवात वैज्ञानिकांच्या अशा प्रयोगांनी होते,

ज्यामुळे पृथ्वीचा विनाश होऊ शकतो. शास्त्रज्ञांना डायनासोर सदृश प्राण्यांची अंडी सापडली आणि पुढच्याच क्षणी एक प्रचंड अवकाशयान पृथ्वीवर उतरले. त्यातून एक एलियन बाहेर पडतो, ज्याच्याकडे विलक्षण शक्ती असते. शास्त्रज्ञ एलियनशी लढण्यासाठी विविध तंत्र वापरत आहेत, तर शिवकार्तिकेयन आणि त्याचे लोक एलियनशी मैत्री करतात आणि त्याला त्यांच्या घरात ठेवतात.

अंतराळ प्रवासाचा थरार
टीझरच्या दुसऱ्या भागात माणसांसोबत राहून त्यांचे चाल चलन शिकताना एलियन्सच्या मस्तीची झलक पाहायला मिळते. अयलान हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे जो आपल्याला अंतराळात रोमांचक प्रवासावर घेऊन जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेत कोई मिल गयाच्या पलीकडे जाऊन घटना दाखवण्यात येणार आहेत.

ज्यामध्ये एलियन आपल्या ग्रहावर परत येतो, परंतु नंतर परिस्थिती कठीण होऊन बसते. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये 2024 मध्ये पोंगल सणादरम्यान प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पृथ्वीवरील हवामान बदलावरही भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटातील व्हिज्युअल्स आणि व्हीएफ चांगले दिसत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe