Yes Bank FD : खासगी क्षेत्रातील बँक येस बँकेने मुदत ठेवी (FD) करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 25 बेस पॉइंट्सने कपात केली आहे. येस बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या ताज्या बदलानंतर, ही बँक आता आपल्या ग्राहकांना FD वर 3.25% ते 7.25% च्या दरम्यान व्याजदर देत आहे.
त्याच वेळी, ही बँक आता आपल्या ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील ग्राहकांना 3.75% ते 8% पर्यंत व्याज देते. व्याजदरातील हा नवीनतम बदल 4 ऑक्टोबर 2023 पासून प्रभावी आहे.

येस बँकेचे FD वरील नवीन व्याजदर
या नवीनतम बदलांनंतर, येस बँक आता आपल्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर वार्षिक 3.25 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, ही बँक आता आपल्या ग्राहकांना पुढील 15 ते 45 दिवसांत परिपक्व होणार्या FD वर वार्षिक 3.70% दराने व्याज देत आहे.
येस बँक 46 ते 90 दिवस आणि 91 ते 120 दिवसांच्या ठेवींवर 4.10% आणि 4.75% व्याज देते. येस बँक आता 121 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 5% व्याज देत आहे. तर 272 ते 1 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 6.35% व्याज मिळेल. येस बँक आता एक वर्ष ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 7.25% दराने व्याज देईल. बँक आता 18 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या FD वर 7.50 टक्के दराने व्याज देत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर किती आहे?
या ताज्या बदलांनंतर, येस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिक श्रेणीत येणाऱ्या ग्राहकांसाठी 3.75% ते 8% दरम्यान व्याजदर देत आहे. येस बँकेच्या वेबसाइटनुसार, ज्या ग्राहकांनी 5 जुलै 19 ते 15 मे 22 या कालावधीसाठी एफडी बुक केली आहे किंवा त्याचे नूतनीकरण केले आहे, त्यांनी मुदतपूर्तीपूर्वी त्यांचे पैसे काढले, तर त्यांच्यावरही दंड आकारला जाईल.